आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शर्टलेस होऊन टायगर श्रॉफने बीचवर केला 'उर्वशी' गाण्यावर डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल, काही तासांमध्ये 9 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला : VIDEO

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. टायगर श्रॉफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो 'उर्वशी' गाण्यावर डान्स करताना दिसतोय. यावर्षी अक्टोबरमध्ये रिलीज झालेले हे रीमिक्स गाणे शाहिद कपूर आणि कियारा अडवाणीवर चित्रित करण्यात आले होते. याचे ओरिजिनल व्हर्जन 1994 मध्ये 'हम से है मुकाबला'मध्ये आले होते. विशेष म्हणजे टायगर या गाण्यावर शाहिद कपूरपेक्षा चांगले मूव्ह दाखवताना दिसतोय. या व्हिडिओला सोशल मीडियावर खुप पसंत केले जात आहे. 
 
टायगरच्या इंस्टाग्राम पेजवर 9 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला हा व्हिडिओ 
- टायगरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला तेव्हा अवघ्या तीन तासांच्या आत या व्हिडिओला 7 लाखांपेक्षा जास्त व्ह्यू आले आणि 6 तासांनंतर हे व्ह्यू 9 लाखांपर्यंत पोहोचले. 'हीरोपंती'(2004) मधून बॉलिवूड डेब्यू केलेल्या टायगरने आतापर्यंत 'बागी' आणि 'बागी 2' सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तो लवकरच 'बागी 3' मध्ये दिसणार आहे. यासोबतच त्याचा 'स्टूडेंट ऑफ दि ईयर' पोस्ट प्रोडक्शनमध्ये आहे. तो सिध्दार्थ आनंदच्या एक अनटायटल्ड प्रोजेक्टमध्येही दिसणार आहे. 
 
 

बातम्या आणखी आहेत...