आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुबेहूब मायकल जॅक्सनसारखा नाचला टायगर श्रॉफ, व्हायरल होत आहे व्हिडिओ 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : टायगर श्रॉफ आपल्या जबरदस्त डान्स आणि तितक्याच जबरदस्त एक्शनसाठी ओळखला जातो. आपली डान्स स्टाइल आणि स्टंट्सने टायगर श्रॉफ सर्वांना हैरान करतो. पुन्हा एकदा टायगर श्रॉफ आपल्या याच स्टाईलमध्ये दिसत आहे. टायगर श्रॉफने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता हुबेहूब आपला डान्स आयकॉन मायकल जॅक्सनसारखाच डान्स करताना दिसत आहे. टायगर श्रॉफचा हा डान्स व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. फॅन्ससोबत सेलेब्रिटीजदेखील टायगरच्या या जबरदस्त डान्सचे खूप कौतुक करत आहे.  

अभिनेत्री श्रद्धा कपूरने टायगरच्या या डान्स व्हिडिओवर कमेंट करून लिहिले, 'टू गुड.' आणि कोरियोग्राफर राहुलने तर टायगर, मायकल जॅक्सनचा पुर्नजन्म असल्याचे म्हणाले. टायगरचा हा डान्स सर्वानाच खूप आवडला. त्याने हा व्हिडिओ फॅन्ससोबत शेअर करून लिहिले, 'आम्ही एमजेचे फॅन त्यांच्यासारखेच होऊ इच्छितो.'