आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tiger Shroff Doing Shooting Of Baggi 3 At Zero Degree Temperatures Mother Aisha Share Emotional Post

झीरो डिग्री तापमानात शूटिंग करतोय टायगर, आई आयशाने लिहिली भावनिक पोस्ट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेता टायगर श्रॉफ सध्या 'बागी-3'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. चित्रपटाची पूर्ण टीम सार्बियामध्ये शूटिंग करत आहे. टायगरला शर्टलेस हाेऊन शूटिंग करावे लागत आहे. यापूर्वी या टीमची काही छायाचित्रे सर्बियाहूनही आली त्यात टीमला चित्रपटाची शूटिंग करताना बऱ्याच अडचणी येत असल्याचे कळते. शूटिंग दरम्यान टायगरसोबत त्याची आई आयशा श्रॉफदेखील आहे. मुलगा टायगरसोबत तिने एक छायाचित्र शेअर करत एक भावनिक चिठ्ठीदेखील लिहिली आहे. फोटोमध्ये टायगर श्रॉफने जाड ब्लँकेट अंगावर घेतले आहे आणि त्याची आई त्याच्यासोबत उभी असल्याचे दिसत आहे.

  • आयशाने फोटोसोबत शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे...,

आपल्या मुलासोबत लोकेशनवर उभी आहे, तो शर्ट काढून झीरो डिग्री तापमानात शूटिंग करतो आहे. समर्पण, मेहनत, शिस्त, इच्छाशक्ती आणि प्रावीण्यासोबत तो आपले सर्व काम करत असतो. त्यामुळेच मी त्याची फॅन आहे. टीम टायगर... अहमद खान, एनजीई आणि क्रू यांचे अाभार... त्यांच्या मदतीमुळे टायगर अशा परिस्थितीत चांगल्या प्रकारे शूटिंग करत आहे, जेणेकरून हा चित्रपट उत्कृष्ट बनू शकेल.