Home | Gossip | tiger shroff film 'student of the year 2' trailer release

'स्टुडंट ऑफ द ईयर 2' चा ट्रेलर रिलीज, जबरदस्त अॅक्शनसोबत दिसली टायगरची दमदार बॉडी, एका अभिनेत्रीला केले Kiss तर दुसरीसोबत केला रोमान्स 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 13, 2019, 05:29 PM IST

'दिन तेरा था...साल मेरा होगा', अशा जोरदार डायलॉगने भरलेला आहे फिल्मचा ट्रेलर... 

  • tiger shroff film 'student of the year 2' trailer release

    मुंबई : करण जोहरची फिल्म 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. सुमारे 3 मिनिटाच्या या ट्रेलरची सुरुवात एका कॉलेज कॅम्पसने होते. ट्रेलरमध्ये कॉलेज स्टुडंट्समध्ये खोड्या, प्रेम आणि युद्ध पाहायला मिटले. फिल्ममध्ये टायगर श्रॉफ जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. एवढेच नाही, अॅक्शनसोबत त्याचा जोरदार डान्स फिल्मचा प्लस पॉईंट ठरू शकतो. ट्रेलरमध्ये तारा सुतारिया आणि टाइगरचा रोमान्सदेखील आहे. दोघे Kiss करताना दिसत आहेत. तर चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे फिल्ममध्ये खूप सिन्दर दिसत आहे.

    दमदार डायलॉग्सने भरलेला आहे ट्रेलर...
    ट्रेलरच्या सुरुवातीला टायगर म्हणतो, ‘लाइफ अगर मैदान है तो उसे दो हिस्सों में डिवाइड करो, एक में सपने और दूसरे में असलियत, जिसे पार वही करता है, जो भरोसा किस्मत से ज्यादा अपनी मेहनत पर करे.’ याव्यतिरिक्त एका सीनमध्ये टायगर हवेत उडी मारून एकदाच 6 लोकांना मारून म्हणतो, 'मैं जिस दिन कबड्डी-कबड्डी कहते हुए तेरे पाले में घुसूंगा, तेरी इज्जत के साथ-साथ तेरी पहचान को भी हवा में उछाल दूंगा.' ट्रेलरमध्ये 'जवानी दिवानी' फिल्मच्या एका गाण्याचे रीमिक्स व्हर्जनदेखील आहे. पुनीत मल्होत्राबाब डायरेक्शनमध्ये बनलेली ही फिल्म 10 मेला रिलीज होणार आहे.

Trending