आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपवीरच्या रिसेप्शनमध्ये गर्लफ्रेंडचा गाऊन सांभाळताना दिसला टायगर, हे पाहून दिशा पाटणीलाही आवरले नाही हसू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : दीपिका-रणवीरच्या लग्नाचे तिसरे रिसेप्शन शनिवारी (1 डिसेंबर) हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडले. यावेळी रणवीरने रोहित गांधी आणि राहुल खन्ना यांनी डिझाईन केलेला ब्लॅक टक्सिडो सूट परिधान केला होता तर दीपिका जुहेर मुराद यांनी डिझाईन केलेल्या रेड कलरच्या गाऊनमध्ये दिसली. यावेळी दिशा पाटणीने बॉयफ्रेंड टायगर सोबत या रिसेप्शनला हजेरी लावली. दिशाने क्रिम कलर चा गाऊन घातला होता. या ड्रेसमध्ये दिशा खूप ग्लॅमरस दिसत होती. पण तिचा तो गाऊन जमीनीवर दिसताच त्याने तो सावरला. टायगरने हातात उचलून धरलेला गाऊन जेव्हा दिशाने पहिला तेव्हा तिला हसू आवरले नाही आणि हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्यांच्या चाहत्यांनाही यावर कंमेंट केल्याशिवाय राहवले नाही. त्यांच्या एका चाहत्याने लिहिले, "इतना तो चलता है". 

 

काही दिवसांपूर्वीही शेअर केला होता ग्लॅमरस फोटो टव्हे खूप झाली होती थट्टा... 
- काही दिवसांपूर्वीही दिशा पाटणीने इंस्टाग्रामवर दिवाळीतील एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये तिने स्पोर्टी ब्रा आणि लाईट क्रिम कलरची ओढणी आणि लेहंगा असा पेहराव केलेला होता. तिच्या ह्या ड्रेससिंग सेन्सची त्यावेळी खूप खिल्ली उडवली होती. एका यूजरने तर कमेन्ट केली होती की, "क्या दिशा ब्लाऊस पेहेनना भूल गयी?"

 

दीपवीरने एक रिसेप्शन बंगळुरूमध्ये तर दोन मुंबईमध्ये दिले.. 
- दीपीका-रणवीरचे लग्न 14-15 नोव्हेंबरला इटलीच्या लेक कोमो मध्ये झाले. त्यांनी 14 तारखेला कोकणी पद्धतीने तर 15 तारखेला सिंधी पद्धतीने विवाह केला. लग्नानंतर 21 डिसेंबरला दीपिकाच्या नातेवाईकांसाठी बंगळुरू मध्ये रिसेप्शन ठेवण्यात आले होते आणि त्यानंतर 28 डिसेंबरला मुंबईमध्ये दुसरे रिसेप्शन होते.  यामध्ये मीडिया आणि दोन्ही कुटूंबाच्या नातेवाईकांना आमंत्रित केले गेले होते. 30 नोव्हेंबरला दीपिका आणि रणवीरने आपल्या कुटूंबासोबत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्याठिकाणी दीपवीरला पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. दीपिका रणवीरची लव्हस्टोरी पाच वर्षांपूर्वी "गॉलियो की रासलीला : रामलीला" या चित्रपटाच्या सेटवर सुरु झाली. त्यानंतर त्यांनी 'फाइंडिंग फैनी', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' या तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

 

बातम्या आणखी आहेत...