आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंचसाठी रेस्तराँत गेली होती दिशा पाटणी, बाहेर येताच चाहत्यांनी घातला घेराव; टायगर श्रॉफने अशाप्रकारे काढले तेथून बाहेर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलीवूड डेस्क - 'एम एस धोनी' चित्रपटातून ओळख बनवणारी दिशा पाटणी 'भारत' मधील आपल्या अभिनयामुळे चर्चेत आली आहे. 'भारत' चित्रपटात राधाची भूमिका पार पाडलेल्या दिशाच्या अभिनयाचे फक्त चाहतेच नाही तर चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनीही कौतूक केले. यासोबतच तिची फॅन फॉलोइंग इतकी वाढली की, ती आता जेथे जाते तेथे तिच्या चाहत्यांची गर्दी जमा होते. असेच काहीसे दृश्य नुकतेच व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळाले. या फोटोत दिशा पाटणी आणि तिचा मित्र टायगर श्रॉफ एका रेस्तराँच्या बाहेर दिसत आहेत आणि चारही बाजुंनी लोकांची गर्दी दिसत आहे. टायगर श्रॉफ दिशाला चाहत्यांपासून वाचवत असल्याचे फोटोत दिसत आहे. 

 


दिशा पाटणी आपला मित्र टायगर श्रॉफसोबत जेवणासाठी मुंबई्च्या प्रसिद्ध रेस्तराँ Bastian मध्ये गेली होती. पण तेथून बाहेर पडताच दिशाला तिच्या चाहत्यांनी घेराव घातला. हे पाहून टायगर तिच्यासोबत पुढे आला आणि तिला तेथून कारमध्ये घेऊन गेला. 

 

'भारत'च्या शानदार ओपनिंगनंतर दिशा पाटणी लवकरच 'मलंग' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती आदित्य रॉय कपूरसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत. यापूर्वी दिशा पाटणीचे 'बागी - 2' साठी कौतूक करण्यात आले होते. तर टायगर श्रॉफ विषयी सांगायचे झाले तर तो 'फाइटर' चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत ऋतिक रोशन, वानी, जावेद जाफरी आणि मोहम्मद जीशान अय्यूब हे देखील असणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...