आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड डेस्क : टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर स्टारर 'बागी 3' चा ट्रेलर गुरुवारी रिलीज झाला. 3.41 मिनिटांचा हा ट्रेलर अॅक्शनने भरपूर आहे. फ्रॅन्चायसीचा दुसरा पार्ट 'बागी 2' नंतर हा चित्रपटही कोरियोग्राफरहून दिग्दर्शक बनलेला अहमद खानने दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची कथा दोन भाऊ विक्रम (रितेश देशमुख) आणि रॉनी (टायगर श्रॉफ) च्या बॉन्डिंगच्या अवतीभोवती फिरतो, ज्यातील विक्रम अपेक्षेपेक्षा कमकुवत आहे आणि रॉनी खूप स्ट्रॉन्ग.
जेव्हाही विक्रमवर एखादे संकट येते तो रॉनीला आवाज देतो. चित्रपटाची कथा भारतातून सीरियापर्यंत पोहोचते, जिथे कोणत्यातरी कामाने गेलेल्या विक्रमला एक एका दहशतवादी संघटनेचे लोक मारहाण करतात आणि त्याला पळवून नेतात. रॉनी त्याला वाचवण्यासाठी तेथे जातो आणि त्या दहशतवादी संघटनेशी भिडतो.
शिव्या देताना दिसली श्रद्धा...
श्रद्धा बोल्ड आणि बिनदास्त आयुष्य जगणाऱ्या मुलीच्या भूमिकेत आहे, जी बोलताना शिव्याही सर्रास देते. ट्रेलरमध्येही याची झलक पाहायला मिळते. 6 मार्चला रिलीज होणाऱ्या या चित्रपटात टायगर, श्रद्धा आणि रितेशव्यतिरिक्त अंकिता लोखंडे, दानिश भट, विजय वर्मा, जयदीप अहलावत आणि जमील खौरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपट साजिद नाडियाडवालाने प्रोड्यूस केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.