आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tiger Shroff Sister Krishna Shroff Learning Taekwondo Jackie Shroff Daughter Action

टायगर श्रॉफलाही भारी ठरते त्याची बहीण कृष्णा, पाहा तिचा अॅक्शन अवतार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर हा वडिलांच्या पाउलावर पाऊल ठेवत फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला. त्याने अॅक्शन स्टार म्हणून स्वतःची वेगळी ओळख बनवली. तर जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा पडद्यामागे राहणे पसंत करते. 25 वर्षांची कृष्णा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसत असते. नेहमी स्टनिंग लूकमध्ये दिसणारी कृष्णा आपल्या भावाप्रमाणे दबंग आहे. याचा अंदाज तिच्या लेटेस्ट व्हिडिओवरुन लावता येऊ शकतो. कृष्णाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती ताइक्वांडो शिकताना दिसतेय.


कृष्णाचा ट्रेनर पारसने तिचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती डिफेंस करते आणि पारस तिच्यावर अटॅक करताना दिसतोय. पारसने कॅप्शनमध्ये लिहिले की, कृष्णाने खुप कमी वेळेत बरेच काही शिकले आहे. 


जॅकी श्रॉफ आणि आयशा श्रॉफची मुलगी कृष्णाचा जन्म 1993 मध्ये झाला. तिने भाऊ टायगरसोबत द अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे मधून आपले शिक्षण पुर्ण केले. यापुर्वी वृत्त होते की, करण जोहरने कृष्णाला 2012 मध्ये आलेल्या 'स्टूडेंट ऑफ द ईयर'साठी ऑफर दिली होती. परंतू तिला नेहमीपासून अॅक्टिंगसोडून पडद्यामागे काम करायला आवडते. यामुळे तिने ऑफर नाकारली आणि आलियाला भूमिका मिळाली.

 

Monday drills with @kishushroff ..cant believe she can do the mitts for me now! Great progress in such a short time.. . . @prilaga #taekwondo #knockout #boxing #mixedmartialarts #ufcfightnight #jiujitsu #sparring #mma #boxinglife #aikido #boxingnews #boxinggloves #dayoff #kickboxing #champion #hapkido #thaiboxing #martialarts #muaythai #warrior #boxinggirl #ufc #boxinggym #sportsman #sport #boxingday #prilaga #wresling #boxingring #judo

A post shared by Genetic Aesthetics (PARAS) (@genetic_aesthetics_paras) on Aug 6, 2018 at 6:23am PDT

 

 

बातम्या आणखी आहेत...