आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tiger Shroff Will Be Seen Playing 'Gatling', The World's Most Powerful Machine Gun In The Movie 'War'

'वॉर' चित्रपटात जगातील सर्वात शक्तिशाली मशीन गन 'गॅटलिंग' चालवताना दिसणार आहे टायगर श्रॉफ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : चित्रपट 'वॉर' मध्ये टायगर श्रॉफ आणि ऋतिक रोशन जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहेत. दोन्ही अभिनेते आपल्या यापूर्वीच्या चित्रपटातही अॅक्शन करताना दिसले आहेत. चित्रपट 'वॉर' च्या मेकर्सनेदेखील त्यांची हीच इमेज सांभाळली आहे. मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च खर्च करून उत्तम अॅक्शन सीन्स चित्रित केले गेले आहेत. टायगर चित्रपटात जगातील सर्वात शक्तिशाली मशीन गन 'गॅटलिंग' चालवणार आहे.  

 

चित्रपटात दिसणार आहे जबरदस्त अॅक्शन... 
चित्रपटाचे डायरेक्टर सिद्धार्थ आनंद म्हणतात, 'वॉर' च्या मेकिंगदरम्यान अखेर ती कोणती गोष्ट आहे जी चित्रपटाला सर्वात मोठ्या अॅक्शन एंटरटेनरच्या रूपात प्रस्थापित करेल. आम्ही हीच गोष्ट कायम लक्षात ठेवली. आमचा प्रयत्न चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना, विशेषतः अॅक्शन जॉनरच्या चित्रपटांना पसंती दर्शवणाऱ्या प्रेक्षकांसमोर अॅक्शन पॅक सादर करण्याचा होता.  

 

शक्तिशाली गन संपूर्ण शहर उडवण्याच्या ताकतीचा आहे... 
ऋतिक आणि टायगर दोघे यापूर्वीदेखील आपल्या चित्रपटांमध्ये आपल्या अॅक्शन अवतारासोबत लोकांना हैरान केले आहे, त्यामुळे आम्हाला मर्यादा आणखी वाढवायच्या होत्या. एका सीनसाठी, आम्हाला जगातील सर्वात शक्तिशाली मशीन गन 'गॅटलिंग' मिळाली आणि यासोबत टायगरवर एक अॅक्शन सीक्वेंस कोरियोग्राफ केला गेला. हे एक असे दृश्य आहे, ज्यामध्ये या शक्तिशाली गनद्वारे संपूर्ण शहर उध्वस्त करताना दाखवले जाणार आहे.  

 

चार अॅक्शन डायरेक्टर्सने कोरियोग्राफ केले अॅक्शन सीन... 
आनंद सांगतो की, 'आम्ही स्पेशलाइज्ड 4 अॅक्शन डायरेक्टर्सला अॅक्शन सीन्सची जबाबदारी सोपवली होती. पॉल जेनिंग्स, फ्रांस पिलहाउस, सी यंग ओह आणि परवेज शेख. हे चार लोक काळजाचा ठोका चुकवणारे अॅक्शन सीन कोरियोग्राफ करण्यामध्ये पारंगत आहेत आणि 'वॉर' मध्येदेखील प्रेक्षकांना असेच काहीतरी पाहायला मिळणार आहे. असे सीन आणि अशी अॅक्शन तुम्ही यापूर्वी कधीच कोणत्या बॉलिवूड चित्रपटात पहिला नसेल. 

बातम्या आणखी आहेत...