आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रपूर जिल्ह्यातील शिवना नदी पात्रात अडकला पट्टेदार वाघ, वन विभागाकडून जखमी वाघाला पकडण्याचे प्रयत्न सुरू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील जूना कुनाडा गावात असलेल्या शिवना नदी पात्रातील दोन दगडांच्या फटीत वाघ अडल्याची माहिती समोर आली. अडकलेला वाघ पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान, वन विभागाच्या रेस्क्यू टीमकडून या वाघाला वाचवण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. 




मिळालेली माहिती अशी की,  आठवडाभरापासून नर वाघाने चारगाव, कुनाडा, देऊरवाडा भागात दहशत निर्माण केली होती. दोन दिवसांपूर्वी चारगाव(सातपुते) खेड्यात तेलवासा ओपन कास्ट खाणीजवळ नागराव पाटील टेकम या शेतकऱ्याच्या शेताजवळ वाघाने बैलावर हल्ला केला होता. त्यात बैल गंभीर जखमी झाला होता. तोच वाघ या परिसरात मादीच्या शोधात फिरत होत. दरम्यान, शिवना नदी पात्रातून जात असताना तो दोन दगडांच्या मध्ये अडकला. याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसेकर मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन लोकांना दूर करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाघाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले.




वाघ जिथे अडकला आहे, तिथे जाण्यास मार्ग नसल्याने वन विभागाला क्रेनची मदत घ्यावी लागली. क्रेनला पिंजरा बांधून त्यात काही कोंबड्या टाकण्यात आल्या जेनेकरुन वाघ उडी मारून पिंजऱ्यात येईल. पण, दगडांमध्ये अडकल्यामुळे वाघ जखमी झाला असून त्याला चालता येत नाहीये. काही वेळेनंतर वाघाने त्या दगडांमधून स्वतःची सुटका करुन घेतली, पण चालता येत नसल्याने तो बाजुला असलेल्या नाल्यात जाऊन बसला आहे. सध्या वाघ जिथे आहे, तिथे जाण्यासाठी मार्ग नाहीये आणि अंधार पडत असल्याने वन विभागाने वाघाला पकडण्याचे प्रयत्न आज थांबवले आहेत. वन विभागाने सांगितले की, जखमी झाल्यामुळे वाघ तिथून कुठे जाणार नाही त्यामुळे उद्या सकाळी त्याला पकडले जाईल.
 

बातम्या आणखी आहेत...