PNB / नीरव माेदीसाठी मुंंबईच्या तुरुंगात कडेकाेट सुरक्षा

गृह विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कारागृह प्रशासनाने नीरव माेदीसाठी या कारागृहात बराक तयार करून ठेवली आहे. 

वृत्तसंस्था

Jun 12,2019 09:39:00 AM IST

मुंबई - पीएनबी बँक घाेटाळ्यातील आराेपी नीरव माेदी याला ब्रिटनमधून भारतात आणण्याचे केंद्र सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ते यशस्वी झाल्यास नीरवला मुंबईतील आर्थर राेड तुरुंगातील बराक क्रमांक १२ मध्ये ठेवले जाऊ शकते.


गृह विभागाच्या अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, कारागृह प्रशासनाने नीरव माेदीसाठी या कारागृहात बराक तयार करून ठेवली आहे. केंद्र सरकारने कारागृह प्रशासनाने विचारलेल्या माहितीनंतर मागील आठवड्यातच प्रशासनाने नीरवला भारतात आणल्यास त्याला बराकीत काेणकाेणत्या सुविधा दिल्या जाऊ शकतात, हे गृह विभागाला सांगितले हाेते.


स्काॅटलंड यार्ड अधिकाऱ्यांनी १९ मार्च राेजी नीरव माेदीला अटक केली हाेती. ब्रिटनमध्ये त्याच्या प्रत्यार्पणासाठी खटला सुरू आहे. केंद्र सरकारने ब्रिटन सरकारला पाठवलेल्या पत्रानुसार, नीरवला आर्थर राेडच्या १२ नंबर बराकीतील दाेनपैकी एका खाेलीत ठेवण्यात येईल. सध्या या बराकीतील एका खाेलीत तीन कैदी आहेत, तर दुसरा रिकामा आहे. २० बाय १५ फुटांच्या या खाेलीत माेदी व विजय मल्ल्या या दाेघांना एकाच वेळी ठेवले जाऊ शकते. या खाेलीत पंखे, सहा ट्यूबलाइट व दाेन खिडक्या आहेत.

X
COMMENT