आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात पोलिसांचा केवळ कडेकोट नव्हे, आता क्यूआर कोड बंदोबस्त, संपर्क लगेच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पोलिस कर्मचारी, अधिकारी यांची संपूर्ण माहिती, एखाद्या मोठ्या बंदोबस्तामध्ये कोण कुठल्या पॉइंटला आहे याची माहिती घेणे, काही सूचना द्यायच्या असतील किंवा माहिती पाहिजे असल्यास एका मेसेजद्वारे सर्वांनाच ही माहिती मिळणार आहे. क्यूआर कोड व आरएफआयडी या तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी डाटा तयार केला आहे. त्याची सुरुवात सोमवारी पंढरपुरातील बंदोबस्ताने होणार आहे. 

 

सोलापूर जिल्ह्यात तीन महामार्ग, पंढरपुरातील ४ मोठ्या वारी बंदोबस्त, नियमित अन्य बंदोबस्त असतो. ग्रामीणचे ग्रामीण पोलिस संख्याबळ २७०० च्या आसपास आहे. पोलिसांना एकत्रित मेसेज देण्यासाठी वायरलेस, पोलिस निरीक्षकांमार्फत निरोप दिला जायचा. आता यात बदल होणार आहे. काल शनिवारी पंढरपुरातील स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालय व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा एकत्रित टीमच्या माध्यमातून डाटा तयार करण्यात आला. तेही तीन तासात. पोलिस अधीक्षकांनी जर एखादा अधिकारी व कर्मचारी यांची माहिती मागितल्यास तत्काळ एका क्लीकवर देण्याची सोय झाली आहे. 

 

काय आहे क्यूआर कोड? ते कसे काम करते? 
पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे नाव, पत्ता, फोन नंबर, नेमणूक ठिकाण असा संपूर्ण डाटा यात देण्यात आला आहे. पोलिस बंदोबस्त ठिकाणी आहेत की नाही याची माहिती पोलिस अधीक्षक क्यूआर कोडच्या माध्यमातून पाहू शकतात. मेसेज द्यायचा असेल तर काही क्षणात मेसेज देतील. तेही एका क्लीकवर. 

 

पोलिस कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती एका क्लीकवर 
पोलिसांचा एकत्रित डाटा करण्यासाठी आम्हाला किमान पंधरा दिवस गेले असते. पंढरपुरातील स्वेरी कॉलेज व आमच्या पोलिस दलातील संगणक ज्ञान असलेल्या कर्मचाऱ्यांची एकत्र टीम तयार करण्यात आली. अवघ्या तीन तासांमध्ये संपूर्ण पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची माहिती एका क्लीकवर आणली. ती माहिती एका विशिष्ट कोडद्वारे ऑपरेटिंग करता येईल. त्या माध्यमातून पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देण्यात येतील. वारीस मुख्य बंदोबस्तात कोण कुठे नेमणुकीस आहे. अधिकाऱ्यांमार्फत यादी तयार करून पाहिले जायचे. आता गर्दीच्या ठिकाणी, बंदोबस्त व महत्त्वाच्या ठिकाणी आर आयडी व कोडचा वापर करून मी सुद्धा अधिकारी-कर्मचारी आहेत की नाही हे पाहू शकतो. निरीक्षक व उप अधीक्षक यांनाही त्यांच्या कर्मचाऱ्यांना काही सूचना द्यायच्या असतील त्यांना ही खास अॅप देण्यात आले आहे. एकूणच या उपक्रमाचा फायदा म्हणजे कर्मचाऱ्यांना काही सेकंदात मेसेज देऊ शकतो. कामाच्या ठिकाणी कर्मचारी आहेत की नाही हे मी कोडच्या माध्यमातून पाहू शकतो. यामुळे पोलिस अधिकारी व कर्मचारी काय काम करतात किंवा त्यांना महत्त्वाची माहिती सूचना माहिती देण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. याचा शुभारंभ सोमवारपासून पंढरपूरच्या बंदोबस्तापासून करण्याच्या विचारात आहोत. हा उपक्रम यशस्वी झाल्यास आणखी दोन टप्प्यांमध्ये वेगळा डाटा तयार करून माहिती संकलित करणार आहोत. 


पोलिस अधिकाऱ्यांनासाठी खास अॅप आहे 
क्यूआर कोड व आरएफ आयडीचा खास अधिकारांसाठी एक अॅप आहे. ते आपले कर्मचारी, कनिष्ठ अधिकारी कुठे काम करत आहेत. कुठे बंदोबस्ताला नेमले आहेत. त्यांना काही सूचना द्यायच्या असतील तर यामार्फत देऊ शकतात. वेळोवेळचे बदलही मेसेजद्वारे एकाच वेळी हजारो पोलिसांना देता येते. 
 

बातम्या आणखी आहेत...