आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tigmanshu Dhulia's Niece Get Troubled By Drunk Boys In Train, Dhulia Appeals For Help On Social Media

तिग्मांशु धूलियाच्या पुतणीला ट्रेनमध्ये मद्यधुंद तरुणांनी दिला त्रास, त्यांनी मागितली मदत, म्हणाले - हेल्पलाइन नंबर्सचा काहीही उपयोग नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : चित्रपट निर्माते तिग्मांशु धूलियाने रविवारी (26 जानेवारी) ला एक ट्वीट करत ट्रेनमध्ये प्रवास करत असलेल्या आपल्या पुतणीसाठी मदत मागितली. बंगळुरूला जाताना चार मद्यधुंद तरुण तिला त्रास देत होते. धूलियाने ट्वीट करत याबद्दल सांगितले. सोबतच म्हणाले की, रेल्वे हेल्पलाइन नंबर्सकडून काहीही प्रतिक्रिया मिळत नाहीये. मात्र त्यांच्या ट्वीटच्या काही वेळानंतरच पोलिस तिथे पोहोचले आणि प्रकरण संभाळले गेले. त्यानंतर त्यांनी मदत करणाऱ्या लोकांचे आभार मानले. सोबतच म्हणाले की, हेल्पलाइन नंबर्सचा काहीही उपयोग नाही. 

तिग्मांशुने ट्वीट करून लिहिले, 'माझी पुतणी उदयन एक्सप्रेसच्या B3 ने प्रवास करत बंगळुरूला जात आहे. तिला चार दारुडे तरुण त्रासदेत आहेत. रेल्वेच्या कोणत्याही हेल्पलाइन नंबरयावरून प्रतिक्रिया मिळत नाहीये. ती घाबरलेली आहे. कुणी मदत करू शकते का.' त्याच्या या ट्वीटवर अनेक यूजर्सने प्रतिक्रिया दिली आणि ते आपापल्या पद्धतीने त्याला मदत करू लागले. एका यूजरने धूलियाच्या ट्वीटला रीट्विट करत त्याला रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे सेवादेखील टॅग केल्या. तर इतर काही युजर्सने रेल्वे मंत्री पीयूष गोयलसह अनेक ट्विटर हॅन्डल्स टॅग करत याप्रकरणी मदत करण्याची अपील केली.  

ट्वीट करून सर्वांचे आभार मानले... 

आधी ट्वीट केल्याच्या सुमारे तासाभरानंतर तिग्मांशुने दुसरे ट्वीट करून मदत करणाऱ्यांचे आभार मानले. त्यांनी लिहिले, 'प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार. मी वास्तविक खूप आभारी आहे की, जेव्हा कोणताही हेल्पलाइन नंबर काम करू शकला नाही. तेव्हा शेवटी भारतात जुगाडने काम केले आणि पोलीस आले. ती आता सुरक्षित आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद.'

धूलिया म्हणाले - हेल्पलाइन नंबर्सचा काहीच उपयोग नाही... 

थोड्या वेळानंतर धूलियाने आणखी एक ट्वीट करून पोलिसांचे आभार मानले, मात्र यासोबतच त्याने सिस्टमवर आपला रोषही व्यक्त केला. त्याने लिहिले, 'मी त्वरित प्रतिक्रियेसाठी पोलिसांव्यतिरिक्त संबंधित विभागांना धन्यवाद म्हणू इच्छितो. पण तरीही मी हे म्हणेन की, हेल्पलाइन नंबर्सचा काहीही उपयोग नाही. समर्थन देण्यासाठी मनापासून तुम्हा सर्वांचे आभार.'

बातम्या आणखी आहेत...