आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- पतियाळा हाउस कोर्टाने आज(शनिवार) उच्च दर्जाचा उपचार मिळण्यासाठी दोषी विनयने केलेली याचिका फेटाळली आहे. न्यायालयाने म्हटले की, मृत्यू दंडाची शिक्षा सुनावलेल्या गुन्हेगाराला चिंता आणि निराशा येणे स्वाभाविक आहे. या खटल्यात दोषी विनयला मुभलक उपचार आणि मानसिक उपचार पुरवले जात आहेत.
यापूर्वीच, तिहार प्रशासनाने विनयच्या आरोग्या संबंधी पतियाळा हाउस कोर्टाला रिपोर्ट सोपवली आहे. विनयने कोर्टाला सांगितले होते की, तो सिजोफ्रेनिया पीडित आहे. त्याचे वकील एपी सिंहने दावा केला होती क, विनयच्या डोक्यात गंभीर जखम आणि हाताला फ्रॅक्चर आहे, तो आपल्या आईलाही ओळखू शकत नाहीये. सुनावनी दरम्यान सरकारी वकील इरफान अहमद म्हणाले की, "विनयची मानसिक स्थिती खराब असल्याचा कोणताच रेकॉर्ड नाही.
काही दिवसांपूर्वी त्याने तुरुंगातील भिंतीवर डोके आपटले होते, त्यानंतर डॉक्टरांनी त्याला पट्टी केली. तुरुंग अधिकाऱ्यांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर केले आहेत. इतकच नाही तो आपल्या आईशी दोन वेळा फोनवर बोलला आहे, त्यामुळे तो आपल्या आईला ओळखू शकत नाही, या गोष्टीत काहीच अर्थ नाही."
चारही आरोपींना कुटुंबाला भेटण्यास सांगितले
चारही आरोपींना आपल्या कुटुंबाशी भेटण्यासाठी तिहार प्रशासनाने लिखीत पत्र दिले आहे. जेल अधिकाऱ्यांनी अक्षय सिंह आणि विनय शर्माला कुटुंबाला भेटण्याची वेळ सांगायला सांगितले आहे. इतर दोन आरोपी मुकेश कुमार आणि पवन गुप्ता आपल्या कुटुंबाशी भेटले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.