Home | National | Other State | Tik Tok Banned in India, Google and Apple Removed Tiktok

अखेर 'टिकटॉक'ची टॉक टॉक बंद, गूगल आणि अॅपलने अॅप स्टोअरवरून टिकटॉक केले हद्दपार; मद्रास हायकोर्टाने दिला होता आदेश

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 17, 2019, 03:58 PM IST

टिकटॉकवर पोर्नोग्राफीला समर्थन देण्याचा आरोप, कोर्टाच्या आदेशानंतर सरकारने गूगल आणि अॅपला पाठवले पत्र

 • Tik Tok Banned in India, Google and Apple Removed Tiktok


  नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून टिकटॉकवर बंदी आणण्याच्या मागणी पूर्ण झाली आहे. गूगल आणि अॅपलने भारतात चायनीज मोबाइल अॅप 'टिकटॉक'वर बंदी आणली आहे. रॉयटर्सने ही माहिती दिली. 'टिकटॉक'मुळे पोर्नोग्राफी आणि मुलांप्रती यौन हिंसेला प्रोत्साहन मिळत असल्यामुळे मद्रास हायकोर्टाने 3 एप्रिल रोजी सरकारला 'टिकटॉक' बंद करण्यास सांगितले होते. अॅप बंद करण्यासाठी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

  टिकटॉकला सुप्रीम कोर्टातही मिळाली नाही मदत

  टिकटॉकची पॅरेंट कंपनी बायटडान्स टेक्नोलॉजीने गेल्या आठवड्यात हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. पण सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण परत हायकोर्टाकडे सुपूर्द केले होते. हायकोर्टाने मंगळवारी टिकटॉकची अपील अमान्य केली. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या मते, केंद्र सरकारने अॅपल आणि गुगलला पत्र पाठवून हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले होते.

  टिकटॉकचे भारतात 24 कोटी युझर्स
  रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार गुगलने मंगलवारी प्लेस्टोरवरून टिकटॉकला हटवले. तर बुधवारपासून अॅपलच्या प्लेटफॉर्मवरही हे अॅप नाहीये. आम्ही स्थानिक कायद्याचे पालन करत असल्याचे गुगलने सांगितले. तर अॅपलकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. 'टिकटॉक'चे युझर स्पेशल इफेक्टने व्हिडिओ तयार करून शेअर करू शकत होते. अॅप अॅनालिटिक्स फर्म सेंसर टॉवरच्या मते, फेब्रुवारी पर्यंत भारतात 24 कोटी लोकांनी टिकटॉक डाउनलोड केले होते.

Trending