TIKTOK / औरंगाबादमधून कुख्यात गुन्हेगाराचा कोर्ट परिसरातील TikTok व्हिडिओ व्हायरल, म्हणतो 'दुआ में याद रखना!'


आरोपींनी TikTok व्हिडिओतून रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत

दिव्य मराठी वेब टीम

May 11,2019 03:26:20 PM IST

औरंगाबाद- नागपुरमध्ये कुख्यात गुंडाने पोलिस व्हॅनमधून TikTok व्हिडिओ बनवून व्हायरल केल्याची घटना ताजी असतानाच आता औरंगाबादमधूनही असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. औरंगाबादमधून खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगाराचा TikTok व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

शेख एजाज इब्राहिम आणि शेख इर्शाद इब्राहिम अशी व्हिडिओत दिसत असलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे TikTok व्हिडिओ बनवल्याचं कोर्ट परिसरात बनवलाय.

आरोपींनी TikTok व्हिडिओतून रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दोन-तीन महिने आत, पुन्हा बाहेर आलो की आपला भाव असाच सुरू राहणार असा उल्लेख या व्हिडिओत गुंडाने केलाय. दोन्ही गुन्हेगार भाई गँगचे म्होरके आहेत. एक खुनाच्या गुन्ह्यात, तर दुसरा मोक्काअंतर्गत अटकेत आहे. जिन्सी परिसरात या गुन्हेगारांची चांगलीच दहशत आहे. नागपूरनंतर आता औरंगाबादमध्येही असा प्रकार उघडीस आल्याने पोलिसांनी अब्रु चव्हाट्यावर आली आहे.

X
COMMENT