Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | til gul eating health benefits on makarsankranti 2019

मकरसंक्रांती : तीळ-गूळ खाल्ल्याने होतात हे खास शारीरिक लाभ

हेल्थ डेस्क | Update - Jan 13, 2019, 12:03 AM IST

प्राचीन काळापासून तिळाचा विविध गोष्टींसाठी उपयोग केला जात आहे. आरोग्यासाठी तीळ खूप लाभदायक मानले जातात, तीळ-गुळासोबत खाल

 • til gul eating health benefits on makarsankranti 2019

  भारतामध्ये प्रत्येक ऋतूनुसार आहाराशी संबंधित काही प्रथा असून या प्रथांचे आपण पालनही करतो परंतु अनेक लोकने यामागचे खरे कारण माहिती नसावे. अशीच एक प्रथा थंडीच्या दिवसात तिळाचे सेवन करण्याची आहे. प्राचीन काळापासून तिळाचा विविध गोष्टींसाठी उपयोग केला जात आहे. आरोग्यासाठी तीळ खूप लाभदायक मानले जातात. यामुळे तीळ तूप आणि गुळासोबत खाल्ल्यास वर्षभर विविध रोग आपल्यापासून दूर राहतात.


  - कोरडा खोकला झाल्यास तीळ आणि खडीसाखर पाण्यासोबत सेवन केल्यास लाभ होईल.


  - तीळासोबत समान प्रमाणात बदाम आणि खडीसाखर रिकाम्यापोटी खाल्ल्यास पचनशक्ती वाढते.


  - तिळाचे भरपूर सेवन केल्यास कॅल्शियम मिळते. याच कारणामुळे हे खाल्ल्याने हाडे तसेच केस मजबूत होतात.


  - थंडीमध्ये रोज काही प्रमाणात तीळ खाल्ल्यास तुम्ही मानसिक समस्येतून मुक्त होऊ शकता.


  - तीळ दुधात भिजवून सेवन केल्यास आणि पेस्ट त्वचेवर लावल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

Trending