आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tim Cook : The Model Of Assembled IPhone 10 In India Will Get Cheaper By 20 Thousand

भारतात असेम्बल्ड आयफोन-10चे मॉडेल 20 हजारांनी स्वस्त मिळतील - टिम कुक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्निया : 'भारतात आयफोन काही महिन्यांतच जगातील इतर देशांपेक्षा २० हजारांनी स्वस्त मिळतील. मात्र, मंगळवारी याच्या लाँचिंगमध्ये ते समाविष्ट नसतील. किंंमत कमी म्हणजे दर्जाशी तडजोड असे नव्हे. मी स्पष्ट सांगू इच्छितो की आयफोन एक प्रीमियम स्मार्टफोन आहे आणि तो वापरण्यातील आनंद टिकवून ठेवणे आमचा मूळ सिद्धांत आहे.' अॅपलचे सीईओ टिम कुक यांचे हे म्हणणे आहे. त्यांनी आयफोन-११ च्या लाँचिंगपूर्व दैनिक भास्करचे सिद्धार्थ राजहंस आणि रोहिताश्व कृष्ण मिश्रा यांना दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टी सांगितल्या. टिम कुक यांच्याशी झालेल्या संवादातील मुख्य अंश...

भास्कर: अॅपलची भारतासाठी काय योजना आहे?
आयफोन-११ तीन कॅमेऱ्यांसह लाँच झाले आहे. तीन कॅमेरे देण्याची अशी कोणती गरज पडली?
तीन कॅमेरे देऊन आम्ही डीएसएलआर कॅमेऱ्याची गरज संपवू इच्छित आहोत. आयफोनचे युजर रोज दर्जेदार फोटो काढण्यासाठी आयफोनचा वापर करू लागले आहेत. म्हणून आम्ही त्यांचा कॅमेरा वापरातील अनुभव अधिक सुखकर करू इच्छित होतो. 'शॉट ऑन आयफोन' अभियान याचाच एक भाग आहे. नव्या फोनमध्ये पहिला कॅमेरा वाइड, दुसरा पोट्रेट टेलिफोटो आणि तिसरा अल्ट्रा वाइड अँगलसाठी आहे. हे कॅमेरे आदर्श सिद्ध होतील.

भारताने सिंगल रिटेल एफडीआय नियमांत सूट दिली. तेथे किती गुंतवणूक कराल? कोणत्या शहरातून प्रारंभ कराल?
आम्ही भारतात विस्तार करू. भारतातही सध्या १,४५० कोटी रु. गुंतवणुकीची योजना आहे. बंगळुरू, हैदराबादेत कार्यालयीन विस्तार करत आहोत. गुरुग्राम व मुंबईत एक्सक्लुझिव्ह आेरिजिनल स्टोअर उघडू. ऑनलाइन सेलसाठी आम्ही जिओची मदत घेत आहोत.

आयफोन महाग आहे. भारतात याची विक्री सतत कमी होत आहे. भारतासाठी अॅपल स्वस्त आयफोन लाँच करेल? असेल तर किंमत किती असू शकते?
भारतासाठी आम्ही दोन आयफोन लाँच करत आहोत. यासाठी दक्षिण भारतात फॉक्सकॉन प्लँटमध्ये आयफोनची असेम्बलिंग सुरू केली आहे. फॉक्सकॉनचा आयफोनची सर्वात मोठी निर्माती कंपनी आहे. भारतात तयार होणारे आयफोन इतर देशांत मिळणाऱ्या फोनच्या तुलनेत २० हजारांनी स्वस्त असतील. मात्र, आयफोन-११ याचा भाग नसेल. भारतीय ग्राहक आयफोन एक्स, एक्सएस व एक्सएस मॅक्सचे व्हॅरियंट इतर देशांच्या तुलनेत स्वस्त खरेदी करू शकतील. विविध मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांशी टायअप करून आम्ही किंमतीचा बोजा कमी करू. जेणेकरून मासिक बिलाच्या किमतीत आयफोन एकप्रकारे फ्री मिळावा. ग्राहकांसाठी हा नवा अनुभव असेल.

फोनबाबत सलग नवे प्रयोग होत आहेत. आगामी काळात आयफोनचे नवे रूप कसे असेल?
सध्या आम्ही ११ डिझाईनवर रिसर्च करत आहोत. टेस्टनंतर आयफोनचे नवे स्वरूप ठरेल. याचे पुढील व्हर्जन एआय, एआर आणि व्हीआरसाेबत मशीन लर्निंगचा वेगळा अनुभवही देईल. याशिवाय जून २०२० मध्ये आयओएस-१४ही लाँच करू.

एमआय, वनप्लस सारख्या कंपन्या आल्यामुळे आयफाेनची क्रेझ कमी झाली आहे का ? विक्री कमी हाेण्याचे हेच कारण आहे का ?
या कंपन्यांचा बहुतांश व्यवसाय भारत आणि चीनपर्यंत मर्यादित आहे. जागतिक पातळीवर विचार करायचा तर आयफाेनची विक्री सातत्याने वाढत आहे. चीनमधील कंपन्यांच्या तुलनेत आयफाेनची किंमत आणि गुणवत्ता कमी करण्याचा आमचा उद्देश नाही. आयफाेन एक प्रिमियम स्मार्टफाेन ब्रँड आहे आणि हा अनुभव कायम राखणे हेच आमचे मूळ तत्त्व आहे. अॅपलची तिमाही विक्रीची आकडेवारी बघितली तर आम्ही चांगली कामगिरी करीत असल्याचे दिसून येते. आयफाेन बाजारात आल्यापासून आतापर्यंत आम्ही कराेेडाे फाेनची विक्री केली असून हे आमच्यासाठी माेठे यश आहे.

अॅपल डेव्हलपर्समध्ये बहुतांश भारतीय
अॅपल साॅफ्टवेअर इंजिनिअरिंगचे उपाध्यक्ष क्रेग फेडेरिगी यांच्या मते आता अॅपलमध्ये जे डेव्हलपर्स काम करत आहे त्यात माेठे याेगदान भारतीयांचे आहे. आम्हाला आमच्या भारतीय कर्मचाऱ्यांचा अभिमान वाटताे. बंगळुरुमध्ये आम्ही आयअाेएस डेव्हलपमेंटच्या प्रशिक्षणासाठी आम्ही पहिले अॅप अॅक्सिलरेटर सेंटर सुरू केले आहे. येथे ५० हजार डेव्हलपर्सला प्रशिक्षण देण्यात आले आहे. कंपनीच्या साेशल इनिशिएटिव्हच्या उपाध्यक्ष लिसा जेक्शन म्हणाल्या, कर्मचाऱ्यांना पाेषक वातावरण देण्यासाठी अॅपल आपल्या अधिकाऱ्यांना रिन्युअल एनर्जी देत आहे.

बातम्या आणखी आहेत...