Home | Business | Share Market | timbore home limited in share market

टिंबोर होम लिमिटेडची समभाग विक्री

दिव्य मराठी प्रतिनिधी | Update - May 29, 2011, 02:16 AM IST

टिंबोर होम लिमिटेड ही कंपनी ३ मे रोजी भांडवल बाजारात प्रवेश करीत आहे.

  • timbore home limited in share market

    मुंबई - टिंबोर होम लिमिटेड ही कंपनी ३ मे रोजी भांडवल बाजारात प्रवेश करीत आहे. गृहसजावटीसाठी लागणाऱया वस्तूंची निर्मिती आणि किरकोळ विक्री करणाऱया या कंपनीची देशभरात ८ दुकाने आहेत. ही कंपनी प्रत्येकी १० रुपये मूल्याचे ३६,९०,००० समभाग विक्रीला आणत आहे. ही समभाग विक्री शंभर टक्के बुकबिल्डिंग पद्धतीने होणार आहे. या विक्रीमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी ५० टक्के तर म्युच्युअल फंडांसाठी केवळ ५ टक्के वाटा राखीव असेल, या समभाग विक्रीसाठी कंपनीने प्रति समभाग ५४ रुपये आणि ६३ रुपये असा दरपट्टा निश्चित केला आहे. या समभागांची नोंदणी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात करण्यात येणार आहे. कॉर्पोरेट स्ट्रॅटेजिक अलायन्झ लिमिटेड ही कंपनी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे.

    कंपनी आपली दुकाने फ्रॅँचायझी तत्त्वावर चालवायला देते. कंपनीचे अहमदाबादमधील चंगोदर आणि वाटवा जीआयडीसी येथे दोन तर आणंद जिल्ह्यातील उमरेथ येथे एक असे तीन प्रकल्प आहेत.

    चांदगोर येथील प्रकल्पामध्ये स्वयंपाकघरासाठी लागणाऱया वस्तूंची तसेच फर्निचरची निर्मिती करण्यात येते, तर वाटवा प्रकल्पामध्ये स्टेनलेस स्टील किचन बास्केटची निर्मिती करण्यात येते. 'टिंबोर या ब्रॅँड नावाने कंपनी मॉड्युलर किचन, दरवाजांच्या फ्रेम्स आदी विविध उत्पादनांची विक्री करते.

Trending