आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'टाईम'ने बदलली भूमिका, आधी लिहिले होते 'Divider in Chief' आता 'Modi Has United India'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - मोदींना 'इंडियाज डिव्हाइडर इन चीफ' म्हणणाऱ्या मॅगझीनेच मोदींचे कौतुक केले आहे.  टाइम या मॅगझीनने आपल्या नवीन अंकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत त्यांनी भारताला सूत्रबद्ध केल्याचे म्हटले आहे. गेल्या अनेक दशकांत कोणताही पंतप्रधान असे करू शकला नाही. मोदींनी मागील वेळेपेक्षा जास्त लोकांचे समर्थन मिळवून पुन्हा एकदा एकहाती सत्ता घेतली. मॅगझीनच्या मते, मोदींनी भारताची सर्वात मोठ्या 'फॉल्ट लाइन द क्लास डिव्हाइड' (जातीगत विभाजन) ला जवळपास संपवले आहे. याच मॅगझीने 10 मे च्या अंकात मोदी हे 'इंडियाज डिव्हाइडर इन चीफ' असा उल्लेख केला होता.  

 

मंगळवारी वेबसाइटवर प्रसिद्ध केला लेख
मंगळवारी टाइमच्या वेबसाइटवर हा लेख प्रसिद्ध झाला. मनोज लाडवा यांनी हा लेख लिहीला आहे. ते ब्रिटनच्या इंडिया इंक या कंपनीचे सीईओ आहेत. या कंपनीमार्फत इंडिया ग्लोबलचा व्यवसाय केला जाते. पण सध्याचा हा लेख मॅगझीनची कव्हर स्टोरी नाहीये. यावेळी टाइमच्या मुखपृष्ठावर अमेरिकेचे डेमोक्रेट नेता एलिजाबेथ वॉरेन यांना स्थान मिळाले आहे. वॉरेन तेथील राष्ट्रपती पदाचे दावेदार आहेत. 

 

निवडणुकीदरम्यान मोदींवर केली होती टीका
लोकसभा निवडणुकी अगोदर टाइमने मे महिन्याच्या अंकात मोदींना आपल्या मुखपृष्ठावर स्थान दिले होते. यामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही मोदींना पुन्हा पाच वर्षांसाठी संधी देणार का? असा प्रश टाइमने विचारला होता. मॅगझीनने आपल्या मुखपृष्ठावर 'इंडीयाज डिव्हाइडर इन चीफ' शीर्षकाने मोदींचा फोटो लावला होता. मोदींवरील हा लेख आतिश तासीर यांनी लिहीला होता. यापूर्वी टाइमने 2014, 2015 आणि 2017 मध्ये मोदींना जगातील सर्वाधिक 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान दिले होते. 

 

मतदानानंतर मॅगझीनने मोदींच्या विजयाबद्दल भाष्य केले

निवडणुकीनंतर टाइमची पत्रकार एलिसा एअरेसने आपल्या एका स्टोरीत मोदींना पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याचे भाष्य केले होते. एलिसा राष्ट्रपती बराक ओबामाच्या प्रशासन काळात डिप्टी असिस्टेंट सेक्रेट्री राहिली आहे. सध्या एअरेस काउंसिल ऑन फॉरेन रिलेशंसमध्ये सिनीअर फेलो आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...