आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Time Magzine: India Former PM And Freedom Fighter Amrit Kaur In TIME Magazine 100 Women Of The Year

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि स्वातंत्र्य सेनानी राजकुमारी अमृत कौर यांना टाइमच्या ‘वुमन ऑफ द इयर’ यादीत स्थान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टाइमच्या लिस्टमध्ये दशकातील प्रमुख महिला सामील, 89 विशेष कव्हर पेज डिझाइन केले

नवी दिल्ली- भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि स्वातंत्रत्य सेनानी राजकुमारी अमृत कौर यांना टाइम मॅगजीनने मागील 100 वर्षात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत निवडले आहे. टाइमने कौर यांना 1947 आणि इंदिरा गांधींना 1976 च्या ‘वुमन ऑफ द इयर’निवडले. यासाठी स्पेशल कव्हर पेजदेखील तयार केले आहे.


मॅगझीनने इंदिरा गांधींसाठी लिहीले, ‘‘1976 मध्ये इंदिरा गांधी ‘इंप्रेस ऑफ इंडिया’ होत्या, ज्यानंतर भारताच्या महान सत्तावादी बनल्या. 1975 मध्ये आर्थिक अस्थिरतेदरम्यान इंदिरा सरकारविरोधात आंदोलनने सुरू झाली होती आणि त्यांच्या सरकारला अमान्य सांगत इमर्जन्सी लागू झाली होती. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंची मुलगी इंदिरा जितकी कठोर होती, तितकीच नाव लौकिक मिळवणारी देखील होती.''

कौर यांनी स्वातंत्र्यासोबतच कुप्रथांविरोधात मोहिम सुरू केली


मॅगझीनने अमृत कौर यांच्याबद्दल लिहीले की, ''कपूरथला येथील रॉयल फॅमिलीशी संबंध असलेल्या राजकुमारी कौर 1918 मध्ये ऑक्सफोर्डमध्ये शिक्षण घेतल्यानंतर भारतात परतल्या आणि महात्मा गांधींच्या तत्वांच्या प्रशंसक झाल्या. त्यांचे लक्ष भारताचे स्वातंत्र्य होते. तसेच, त्यांनी महिलांचे शिक्षण, त्यांचा मतदानाचा अधिकार, बालविवाह थांबवणे असे अनेक सामाजिक मुद्दे उपस्थित केले. 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर कॅबिनेटमध्ये सामील होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्या 10 वर्षे भारताच्या आरोग्यमंत्री होत्या. यादरम्यान त्यांनी इंडियन काउंसिल फॉर चाइल्ड वेलफेयरची सुरुवात केली आणि मेडिकल कॉलेजला सुरू करण्यात महत्वाचा भूमिका घेतली. यासोबतच लोकांना मलेरिया आणि इतर संक्रमक आजारांबद्दल जागरुक केले.''

‘100 वुमन ऑफ द इयर’ दशकातील महिलांना समर्पित

टाइम मॅगझीनने सांगितले की, ‘100 वुमन ऑफ द इयर’मध्ये दशकातील प्रत्येक वर्षातील ‘वुमन ऑफ द इयर’निवडण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या 72 वर्षापर्यंत टाइममध्ये ‘मॅन ऑफ द इयर’ प्रोजेक्ट सुरु होता, ज्यात राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा उद्योगपती असायचा. त्यानंतर पुरुषांचे वर्चस्व संपवण्यासाठी 1999 मध्ये याला बदलून ‘पर्सन ऑफ द इयर’ करण्यात आले, तरीदेखील यादीत पुरुषांनाच जागा मिळत होती. यावर्षी मॅगझीनने महिलांसाठी ‘100 वुमन ऑफ द इयर’ मोहिम सुरू केली.'

या महिलांचा यादीत समावेश


मॅगजीनने इतर महिलांमध्ये डिझइन कोको चॅनल, लेखक वर्जीनिया वोल्फ, क्वीन एलिजाबेथ, अभिनेत्री मर्लिन मुनरो, प्रिंसेस डायना, चीनी केमिस्ट तु युयु, यूएन की रिफ्यूजी एजेंसीचे नेतृत्व करणाऱ्या जापानच्या सदाको ओगाटा आणि अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा आहेत. टाइमने या महिलांसाठी 89 कवर पेजदेखील तयार केले आहेत. तसेच, पर्सन ऑफ द इयर राहीलेल्या 11 महिलांसाठी वेगळे कव्हर पेज तयार करण्यात आले आहे.