आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3700 मधून 2018 मध्ये आलोय, टाइम ट्रॅव्हलर म्हणवणाऱ्याचा दावा, म्हणाला-भविष्यात एका चुकीमुळे नष्ट होईल मानव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडा - भविष्य आणि भूतकाळात जाण्या-येण्याच्या दाव्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्वतःला टाइम ट्रॅव्हलर म्हणवणाऱ्या एका व्यक्तीने नुकताच असाच एक दावा केला आहे. त्याने इसवीसन 3700 मधून टाइम ट्रॅव्हल करून आल्याचे सांगितले. हातातील एक विचित्र गोष्ट दाखवत तो म्हणाला की, त्याने भविष्यात जाऊन एका रोबोटला मारले. तो त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याने दावा केला की, मानवाचा अंत रोबोट्सच्या हातानेच होईल. भविष्यातील काही घटनांबाबत त्याने इशाराही दिला. 


गुप्तचर संस्था करतात हे काम 
पॅरानॉर्मल अॅक्टिव्हीटीज आणि  विचित्र दाव्यांबाबत माहिती देणार्या अॅपेक्स चॅनलशी बोलताना या व्यक्तीने त्याचे नाव माइक असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, कॅनडाच्या एका गुप्तचर संस्थेसाठी तो काम करतो. त्याने सांगितले की, नॅशनल सिक्योर लॅबोरेटरीमध्ये अशी सर्व साधने आहेत जी भविष्यात जाण्या - येण्यासाठी कामी येऊ शकतात. सामान्य व्यक्ती त्या शोधू शकत नाही. 


18 वेळा गेलो इसवीसन 3700 मध्ये 
माइक म्हणाला की, तो 18 वर्षांचा असल्यापासून गुप्तचर संस्थेशी संलग्न आहे. त्याला इतर अनेक लोकांबरोबर भविष्यात जाऊन आला आहे. सिक्रेट मिशनसाठी 18 वेळा इसवीसन 3700 मध्ये जाऊन आल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, त्या काळात मानवासारखे दिसणारे रोबोट असतील. ते अत्यंत शक्तीशाली आणि दुशार असतील. मानवाप्रमाणेच ते विचार करू शकतील. 


आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे युद्ध 
माइकने सांगितले की, रोबोट्सना अधिक समजूतदार बनवणे हेच मानवाच्या विनाशाचे कारण बनेल. त्याने इसवीसन 3700 बद्दल सांगताना म्हटले की, मशीन आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अधिक हुशार बनेल. मशीन स्वतःबाबत विचार करू लागतील. त्यांना असे वाटू लागेल की, त्यांना तयार करणारी व्यक्ती आपल्याला नोकर बनवले. त्यामुळे लीडर बनण्यासाठी मशीन विनाश सुरू करतील. 


जीवाला धोका 
या व्यक्तीने व्हिडिओच्या अखेरीस सांगितले की, आता गुप्तचर संस्था त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण तो कंपनीतून पळाला असून त्याने टाइम मशीन आणि टाइम ट्रॅव्हलचे सर्व गूढ सर्वांसमोर मांडले आहे. 

बातम्या आणखी आहेत...