आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: सेक्शुअल हॅरेसमेंटची शिकार झाली होती TV ची \'बहू\', रियल लाइफमध्ये आहे ग्लॅमरस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टीव्ही शो 'उतरन' मध्ये सुनेच्या भूमिकेतील इच्छा अर्थात टीना दत्ता 31 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 27 नोव्हेंबर 1986 ला झाला होता. टीना सेक्शुअल हॅरेसमेंटची शिकार झाली होती. दोन वर्षांपुर्वी डिसेंबरमध्ये एका इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी टीना दत्ता मुंबईहून राजस्थानला निघाली होती. फ्लाइटमध्ये एका पॅसेंजरने तिच्यासोबत छेडछाड करत चुकीच्या पद्धतीने स्पर्ष करण्याचा प्रयत्न केल होता. टीनाने या प्रकाराची तक्रार देऊनही त्यावर काही अॅक्शन झाली नव्हती.


रियल लाइफमध्ये ग्लॅमरस आहे टीना
- टीनाला तुम्ही टीव्हीवर 'बहू'च्या रोलमध्ये एकदम सोज्वळ रुपात पाहिले असेल मात्र रियल लाइफमध्ये टीना दत्ता ही अतिशय ग्लॅमरस आहे. 
- फ्लाइटमध्ये झालेल्या छेडछाडीबद्दल तिने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते, की माझे अर्धे जग फिरून झाले आहे. मात्र असे माझ्यासोबत कधी घडले नव्हते. 'मी राजकोटला जात होते. मला 30A सीट अलॉट झाले होते. माझ्या मॅनेजरला 30C देण्यात आले. आम्ही दोघे बोलत असताना मला जाणवले की कोणीतरी आपला हात सरकवत आहे.'
- 'सीट नंबर 31A वर बसलेला पॅसेंजर चुकीच्या पद्धतीने स्पर्ष करण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला मला वाटले एखाद्या लहान मुलाचा हात असेल मात्र जेव्हा मी पाहिले तेव्हा तिथे एक माणूस होता. मी ओरडल्यानंतर तो माफी मागू लागला होता.'

 

ऐश्वर्या रायबरोबर केले आहे काम.. 
- टीना 16 वर्षांची असताना तिने ऐश्वर्या रायबरोबर 'चोखर बाली'(2003) मध्ये झळकली आहे. 
- नंतर तिने सैफ अली खान आणि विद्या बालन स्टारर 'परिणिता'(2005) चित्रपटातही झळकली होती. 
- टीना बंगाली चित्रपट 'चिरोडिनी तुमि जे अमार'(2008) मध्येही झळकली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...