आगळी-वेगळी सर्जरी / एक ग्राम वजनी गोल्ड फीशच्या पोटातून बाहेर काढला ट्यूमर, यूकेमधील आतापर्यंतचा सर्वात लहान पेंशट

89 रुपयांच्या माशासाठी मोजले 8912 रुपये

Sep 20,2019 05:03:03 PM IST

लंडन- इंग्लंडच्या ब्रिस्टलमधील वेट्स वेटरनरी हॉस्पिटलमध्ये मोली जातीच्या गोल्ड फिशचे कठीण ऑपरेशन यशस्वी पार पडले. त्या माशाच्या पोटात ट्यूमर झाले हाते. या ट्यूमरला 40 मिनीटांच्या ऑपरेशननंतर काढण्यात आले. या ऑपरेशनसोबतच गोल्ड फिश यूके (यूनाइटेड किंगडम) मध्ये सर्जरी करुन घेणारी सर्वात लहान पेशंट ठरली आहे.


गोल्ड फिशचा मालक तिच्यावर खूप जीव लावतो, त्यामुळे त्याने 89 रुपयात विकत घेतलेल्या माशावर 8912 रुपये खर्च केले. त्या गोल्ड फिशवर सर्जरी करणाऱ्या हॉस्पीटलने यापूर्वी सरडा, पाल, साप आणि मगरी सारख्या प्राण्यावरही सर्जरी केली आहे.


हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सोन्या माइल्सने सांगितले की, गोल्ड फिशला मालकाला ही गोल्ड फिश काही दिवसांपूर्वी त्याच्या शेजाऱ्याने गिफ्ट केली होती. काही दिवसानंतर त्याला माशाच्या पोटात गाठ येत असल्याचे दिसले. त्यानंतर त्याने माशाला सर्जरीसाठी हॉस्पीटलमध्ये नेले. गोल्ट फिश आतापर्यंत आलेली सर्वात लहान पेंशट असल्याचे सोन्याने सांगितले. ऑपरेशनच्या वेळी गोल्ड फिशचे वजन फक्त एक ग्राम होते. ट्यूमर काढायला 40 मिनीटे लागली.

X