Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | tips and information for healthy kidneys

कमी झोप, जास्त मीठ किडनीसाठी नाही ठीक 

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 12, 2019, 12:15 AM IST

पाणी आपल्या शरीराची गरज आहे. पाणी कमी प्यायल्यास नकारात्मक परिणाम होतो. किडनी रक्त शुद्ध करते

 • tips and information for healthy kidneys

  शरीरात रक्त शुद्ध करणे, हार्मोन तयार करणे, खनिजे शोषून घेणे, युरिन तयार करणे, विषाक्त तत्त्वे बाहेर काढणे आिण अॅसिडचे संतुलन ठेवण्याचे आवश्यक काम किडनी करते. कित्येकांना किडनीच्या आजाराबाबत शेवटच्या स्टेजला समजते. शरीराच्या या भागाला आरोग्यदायी ठेवण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात.


  1.जास्त पाणी प्या
  पाणी आपल्या शरीराची गरज आहे. पाणी कमी प्यायल्यास नकारात्मक परिणाम होतो. किडनी रक्त शुद्ध करते. विषाक्त पदार्थांना शरीरापासून वेगळे करते. ज्यात पाण्याची भूमिका महत्त्वाची आहे. पाणी कमी प्यायलात तर शरीरात विषाक्त तत्त्वे जमा होऊ लागतील. निरोगी व्यक्तीला २-३ लिटर पाणी प्यायला पाहिजेे.


  2. कमी मीठ खा
  बरेच लोक गरजेपेक्षा जास्त मीठ खातात. यामुळे शरीरातील सोडियम वाढते. ज्यामुळे रक्तदाबावर परिणाम होतो. वाढलेल्या रक्तदाबामुळे किडनीवरील दाब वाढतो. असे होणे तुमच्या शरीरासाठी घातक होऊ शकते. म्हणून मिठाचे प्रमाण कमीच असावे, नाही तर इतर आजारांचीही शक्यता असू शकते.


  3.पुरेशी झाेप घ्या
  झोप पूर्ण न झाल्यामुळेदेखील किडनीशी संबंधित समस्या होऊ शकतात. झोपेदरम्यान किडनीच्या पेशीपर्यंत पोहोचणाऱ्या नुकसानीची भरपाई होते. झाेप न झाल्यामुळे मेटाबॉलिझमवरदेखील परिणाम होतो. तणाव वाढतो, ज्यामुळे किडनीवर विपरीत परिणाम होतो. पुरेशी झोप घेतल्याने फ्रेश तर वाटतेच, शिवाय निरोगीही राहता.


  4. यूरिनला थांबवू नका
  काही लोक युरिनला थांबवून ठेवतात. यामुळे किडनीशी संबंधित समस्या वाढू शकतात. सारखे असे केल्यामुळे किडनी स्टोन किंवा किडनी खराब होण्यासारखी समस्या होऊ शकते. ज्याप्रमाणे जास्त पाणी पिणे गरजेचे आहे, त्याप्रमाणे यूरिन बाहर काढणे गरजेचे आहे म्हणून युरिन थांबवून ठेवण्याची चूक अजिबात करू नका.


  5. धूम्रपान करू नका
  धूम्रपान किंवा तंबाखू सेवनाने रक्तनलिकेमध्ये रक्तप्रवाह मंदावतो आिण किडनीमध्ये रक्तपुरवठा कमी होतो. त्याची कार्यक्षमता कमी होते. म्हणून धूम्रपान आिण तंबाखूचे सेवन करू नये. तसे पाहिले तर धूम्रपान आिण इतर नशा शरीराला कोणत्या कोणत्या प्रकारे नुकसानदायक असते. त्यामुळे यापासून दूर राहा.

Trending