Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | tips for after exercising ...

व्यायामानंतर ही घ्या काळजी... 

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 12, 2019, 12:10 AM IST

दुखणाऱ्या भागावर बर्फ लावून थोडा वेळ मसाज करा. हा दुखणे कमी करण्याचा योग्य उपाय आहे.

 • tips for after exercising ...

  व्यायामानंतर ज्या वेळी स्नायंूमध्ये वेदना होतात त्या वेळी स्नायूंवर जास्त ताण आलेला असतो आणि तुमचे स्नायू रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करत असतात. हे दुखणे सामान्यत: ४८ तासांपर्यंत असते. परंतु यानंतरही जर दुखणे कमी झाले नाही तर हे उपाय करू शकता.


  या दुखण्याला कमी करण्याचे काही उपाय
  - दुखणाऱ्या भागावर बर्फ लावून थोडा वेळ मसाज करा. हा दुखणे कमी करण्याचा योग्य उपाय आहे.


  - व्यायाामापूर्वी आणि नंतर कमीत कमी १० मिनिटांपर्यंत स्ट्रेचिंगचा व्यायाम केल्यास स्नायूंचे दुखणे दूर होऊ शकते.


  - दिवसभर भरपूर पाणी प्या. यामुळे शरीरात ओलावा टिकून राहतो आणि तुम्हाला जास्त थकवाही येणार नाही.


  - तुम्ही प्रोटीन पावडरदेखील घेऊ शकता. कारण यामुळे अमिनो ऍसिड तयार होते. ते स्नायूंना बरे करण्यास आणि बळकट बनवते.

Trending