आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरणानंतर बाळाच्या दुखण्यावर तीन उपाय 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळाच्या लसीकरणानंतर चिंता करण्याऐवजी काही उपाय करून पाहा, जेणेकरून मुलांचे रडणे कमी होऊ शकेल. 


1. स्तनपान करा 
लसीकरणानंतर लगेच बाळाला स्तनपान दिल्यास त्याला शांत करण्यास मदत मिळू शकते. स्तनपानापासून मिळणारा शारीरिक ओळख आणि जवळिकीमुळे बाळाला मदत मिळते. यामुळे त्याला आराम आिण दुखणे विसरण्यास मदत होईल.


2. लक्ष विचलित करा 
बाळाला त्याचे आवडते खेळणे द्या आणि त्याचे दुखण्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी त्याच्यासोबत खेळा. घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या इतर मुलांसोबत काही वेळ त्याला राहू द्या. 


3. बर्फ लावा 
बरेचसे डॉक्टर इंजेक्शन दिलेल्या त्या जागेवर बर्फ लावण्याचा सल्ला देतात. यामुळे बाळाचे दुखणे कमी होण्यास मदत होते. पण इंजेक्शन लावलेल्या जागेवर मालिश करू नका. यामुळे बाळाचा त्रास वाढू शकतो. एक किंवा दोन दिवसांमध्ये लसीकरणाचे दुखणे आपोआप कमी होऊन जाते. 

बातम्या आणखी आहेत...