आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंद आचेवर अंडी उकडा, पोषक द्रव्ये मिळतील

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

अंडी उकडताना नेहमी आपण काही चुका करतो. त्यामुळे अंडी फुटतात. काही सोप्या टिप्स वापरून या चुका टाळू शकता. योग्य पद्धतीने अंडी उकडल्यास निश्चितच फायदा होईल. >अंडी उकडण्यासाठी पाणी गरम करून त्यात अंडी टाका. याने अंडी फुटणार नाहीत व पोषक द्रव्ये टिकून राहतील. >मंद आचेवर १० मिनिटे अंडी उकडणे पुरेसे ठरते. यामुळे अंड्यांतील पूर्ण पोषक द्रव्ये मिळतील. >अंडी उकडताना पाण्यात मीठ टाका. यामुळे उकडल्यानंतर अंड्याची साल सहज निघेल. >तुम्हाला हाफ बॉइल्ड एग खायचे असतील तर अंडी ३-४ मिनिटेच उकडा. >तुम्हाला हार्ड बॉइल्ड एग आवडत असतील तर अंडी १० मिनिटांपेक्षा जास्त उकडा. >अंडी उकळताना ते पाण्यात पूर्णपणे बुडतील असे पाहा. पाणी कमी असल्यास अंडी फुटू शकतात. >अंडी उकडताना टिचले तर त्याच्या सालीवर व्हिनेगर लावा. यामुळे अंडी पूर्णपणे तुटणार नाहीत. >उकडल्यानंतर तत्काळ गार पाण्यात टाकू नका. यामुळे पिवळ्या भागाचा रंग हलका होईल व चव बिघडेल. >उकडण्याअगोदर चांगल्या प्रकारे धुऊन घ्या. यामुळे सालीमधील साल्मोनेला बॅक्टेरिया पूर्णपणे दूर होईल. >उकडलेल्या अंड्याची साल वरच्या भागापासून काढा. हवेच्या बुडबुड्यांनी अंडे सोलता येईल.

बातम्या आणखी आहेत...