आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्जपुरवठा करणाऱ्या तसेच एफएमसीजी क्षेत्रातील गुंतवणुकीतून मिळू शकतो चांगला परतावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस- २०१९ मध्ये बाजाराच्या स्थितीबाबत तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. मात्र, पहिली सहामाही अस्थिर राहणार असल्याचे जवळपास सर्वच तज्ज्ञांचे मत आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर दुसऱ्या सहामाहीत तेजी येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल याची माहिती घेणेही महत्त्वाचे आहे. 

 

वित्त पुरवठादार कंपन्या आणि मोजक्या खासगी बँकांत संधी : 

माझ्या मते वित्त सेवा क्षेत्रात अल्प मुदतीमध्ये चांगली सुधारणा होण्याची शक्यता आहे. डिसेंबर आणि मार्च तिमाहीमध्ये या क्षेत्रातील कंपन्यांची आकडेवारी सकारात्मक राहण्याची अपेक्षा आहे. या क्षेत्राने बाजाराला आउटपरफाॅर्म केले आहे. ही मजबुती पुढील काळातही राहण्याची अपेक्षा आहे. वास्तविक या क्षेत्रातही काही शेअरमध्येही घसरण नोंदवण्यात आली आहे. उदाहरणासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा विचार करता येईल. मात्र, वित्त पुरवठादार कंपन्या मोजक्या खासगी बँकांमध्ये सकारात्मक वाढ दिसून येत आहे. २०१९ च्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्चदरम्यान या बँकांच्या शेअरमध्ये चांगली वाढ दिसून येण्याची शक्यता आहे. 

 

२०१८ च्या सुरुवातीला जागतिक बाजारात घसरण दिसून आली होती. त्या नंतर बाजारात तेजी आली. मात्र, वर्षाच्या अखेरीस पुन्हा बाजारात घसरण नोंदवण्यात आली. भारत सोडल्यास सर्वच प्रमुख देशांच्या शेअर बाजारातील निर्देशांकात गेल्या वर्षात घसरण नोंदवण्यात आली आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या अखेरच्या दोन महिन्यांत ज्या शेअरमध्ये सुधारणा झाली, त्यामध्ये आर्थिक सेवा क्षेत्राचा प्रामुख्याने समावेश आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि एचडीएफसी चांगल्या स्थितीत दिसत आहे. वास्तविक अलीकडच्या काळात कोटक बँकेच्या स्थितीतही सुधारणा होत आहे. एसबीआयदेखील मजबूत स्थितीत दिसत आहे. २०१९ मध्ये हे शेअर चांगले प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. 

 

एफएमसीजी मध्ये टाटा ग्लोबल आणि कोलगेट चांगले : 
आर्थिक सेवा क्षेत्रानंतर गुंतवणूकदारांना एफएमसीजी क्षेत्रातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या काही घटना घडण्याची शक्यता आहे. निफ्टीमधील एफएमसीजी निर्देशांक अल्प मुदतीमध्ये २८,४०० या पातळीवर बेस बनवण्याचा प्रयत्न करत आहे. या क्षेत्रात गेल्या काही दिवसांत वरच्या पातळीवर विक्रीचा मारा दिसून आला. सध्या हे क्षेत्र गुंतवणुकीसाठी आकर्षक पातळीवर आहे. वास्तविक पाहता एफएमसीजी क्षेत्र कायमच चांगले प्रदर्शन करणारे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. आर्थिक स्थिती खराब असली तरीदेखील लोक एफएमसीजी क्षेत्रातील उत्पादने खरेदी करतात. खरे तर अल्प मुदतीसाठी आम्ही यामध्ये मोजक्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देऊ. यामध्ये टाटा ग्लोबल आणि कोलगेट प्रमुख आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमध्ये अजूनही सुधारणा कायम राहण्याची अपेक्षा आहे. औषधी क्षेत्रात मात्र नकारात्मक स्थिती दिसून येत आहे. यामुळे ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांनी पुढील काही महिने या क्षेत्रापासून दूर राहायला हवे.