Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | tips for hair care in rainy season

पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी 

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 17, 2019, 12:10 AM IST

पावसाळ्यात केसांचे सौंदर्य बऱ्याचदा बिघडते. अशावेळी केसांचा पोत, सौंदर्य पावसाळ्यात कशा प्रकारे उत्तम राहील याकरिता काही टिप्स… 

 • tips for hair care in rainy season

  पावसात कामानिमित्त बाहेर जाताना केसांचे सौंदर्य बऱ्याचदा बिघडते. वेगवेगळ्या ऋतू आणि हवामान बदलाचा केसांवरही परिणाम होतो. बदलत्या ऋतूमध्ये आरोग्य आणि केसांची काळजी घेण्याची पद्धत प्रत्येक तरुणीची बदलते. पावसाळ्यात केसांचे सौंदर्य बऱ्याचदा बिघडते. अशावेळी केसांचा पोत, सौंदर्य पावसाळ्यात कशा प्रकारे उत्तम राहील याकरिता काही टिप्स…


  . पावसाळा सुरू झाल्यास शक्यतो वेगवेगळ्या हेअर स्टाइल करणे टाळावे. जरी हेअर स्टाइल करायची असेल तर हेअर स्प्रे, हेअर जेलचा वापर पावसाळ्यात करणे टाळा.
  २. केस धुण्यासाठी सौम्य शाम्पूचा वापर करा. आठवड्यातून दोन वेळा केस धुऊन एकदा कंडिशनर लावावे.


  ३. पावसाळ्यात हेअर स्ट्रेटनिंग करणे तसेच सतत आयनिंग करणे टाळावे.
  . पावसाळ्यात केस ओले झाले असल्यास मोठ्या दातांचा कंगवा किंवा लाकडी कंगवा वापरा. त्यामुळे केस जास्त तुटणार नाहीत.


  ५. पावसाळ्यात सतत होणाऱ्या वातावरण बदलामुळे केसांवर त्याचा विपरीत परिणाम होतोच. या वातावरणातील ओलावा, आर्द्रतेमुळे केस तेलकट आणि चिकट होतात. त्यामुळे दोन वेळा तरी केस धुवावेत.
  ६. केसांना १५ मिनिटे लिंबाचा रस लावून केस धुतल्यास केसांचा तेलकटपणा तसेच केस चिकट होणार नाहीत.


  ७. केस भिजले असल्यास लगेच बांधू नयेत. यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकते.
  ८. पावसाळ्यातील प्रवासात केस भिजले असेल तर लगेच स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावेत.

Trending