Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | tips for hair loss problem during the monsoon

 पावसाळ्यात केसगळतीची समस्या, बचावासाठी खा दही आणि पालक

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 09, 2019, 12:15 AM IST

पावसाळा आला की, वातावरणात दमटपणा येतो. याचा परिणाम केसांच्या समस्येच्या रुपात समोर येतो. केसांच्या समस्येपासून बचावासाठी तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा....

 • tips for hair loss problem during the monsoon

  पावसाळा आला की, वातावरणात दमटपणा येतो. याचा परिणाम केसांच्या समस्येच्या रुपात समोर येतो. काही लोक केस गळण्यामुळे त्रस्त असतात. बऱ्याच लोकांच्या केसात कोंड्याची समस्या निर्माण होते. केसांच्या समस्येपासून बचावासाठी तुमच्या आहारात काही वस्तूंचा समावेश करा.


  1. सूर्यफुलाच्या बिया
  सूर्यफुलाच्याबिया व्हिटॅमिन ई आणि झिंकचे एक उत्कृष्ट स्रोत आहे. केस निरोगी राहण्यासाठी हे दोन्ही महत्त्वाची भूमिका निभावतात. या बियांमध्ये व्हिटॅमिन बी ६ चे उत्तम स्रोत आहे. ज्याला पायरीडोक्झाइन असे म्हणतात. या झिंकमुळे अवशोषण होते आणि स्कॅल्पपर्यंत रक्तप्रवाह वाढवते. यासोबतच केसांची वाढ होण्यास मदत करते. रोज एक चमचा बिया पुरेशा आहेत.


  2. दही
  तुमच्या आहारात दह्याचा समावेश आरोग्यासाठी लाभदायक आहे. सोबतच केस निरोगी ठेवण्यासाठी खूप मदतगार आहे. यात असणारे खनिजे, प्रोबायोटिक बॅक्टेरिया केसांना मजबूत आणि चमकदार बनवते. दह्यापासून बनणारी लस्सी, ताक, कोशिंबीरदेखील खाऊ शकता.


  3. पालक
  पालकामध्ये लोह आणि फोलेटची चांगली मात्रा आहे. यामुळे केस गळती थांबवण्यासाठी मदत होते. परंतु या ऋुतूमध्ये मिळणाऱ्या पालकांमध्ये माती जास्त असते.म्हणून उपयोग करण्यापूर्वी याला चांगल्याप्रकारे धुवून घ्यावे किंवा उकळून नंतर भाजी बनवा. याचे सूपही लाभदायक आहे.


  4. मेथीदाणे
  हार्मोन्समुळे केस गळण्याच्या समस्येमध्ये मेथी दाणे विशेषत: उपयोगी आहे. थोड्याशा नारळ तेलामध्ये मेथीचे दाणे टाकून गरम करा, थंड झाल्यावर याने डोक्याची मालीश करा आणि रात्रभर लावून ठेवा. याला भाजीत मिसळून खा. याचे पाणी पिणे केसांसाठी लाभदायी आहे.


  5. शिमला मिरची
  सामान्यत: व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे केसांचा रुक्षपणा वाढतो आणि ते लवकर तुटतात. शिमला मिरचीमध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि लोह असते. जे केसांचा रुक्षपणा दूर करते. याची भाजी बनवून किंवा सलादमध्ये मिसळून खाऊ शकता. यामुळे केस पांढरे होत नाहीत.

Trending