आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यात तुमच्यासाठी लाभदायक आहे तुळस, जाणून घ्या इतरही खास गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्या दरम्यान तुमच्या आहारात या काही वस्तूंचा समावेश करा. यामुळे तुमची रोग प्रतिकारक्षमता वाढेल. यासह या ऋुतूत होणाऱ्या संसर्गापासून बचावही होईल. 
१. तुळस 
पावसाळ्यात दररोज तीन-चार तुळशीची पाने खा. यात अँटीव्हायरल एजंट असते तसेच यात अँटीऑक्सीडेंटसही भरपूर असते. तुम्ही पाहिजे तर सलादमध्ये याची ३-४ पाने कापून टाकू शकता किंवा या पानांना धुवून गुळासोबत खाऊ शकता. याशिवाय तुळशीचा हर्बल चहादेखील पिऊ शकता. 


२. लसूण 
या ऋुतूत सूप बनवताना त्यात भाज्यांसोबतच लसणाच्या काही कळ्या टाका. लसणामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते.यासोबत शरीरातील विषारी द्रव्ये बाहरे काढण्यास मदत करते. लसणाला वाळवून, भाजून भाज्यांमध्ये मसाल्यांसोबत याचा उपयोग करू शकता. भाजलेला लसूण तुमच्यासाठी फायदेशीर आहे. 


3. नारळ पाणी 
यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स आणि मिनरल्स ची भरपूर मात्रा असते. हे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. या ऋुतूत होणाऱ्या सामान्य आजारांपासून वाचवण्यासाठीदेखील नारळ पाणी गुणकारी आहे. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये दूर करण्यास सहायक आहे. नारळ पाणी यकृत आिण पोटासंबंधी आजारापासून वाचवण्यास परिणामकारक आहे. 


४. एलोवेरा ज्यूस 
एलोवेरामध्ये व्हिटामिन्स, एंजाइम्स आणि प्रोटीनची मात्रा अधिक प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती आणि रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते. यामुळे हृदय आिण यकृताच्या आजारांपासून बचाव करण्यास परिणामकारक आहे, परंतु तुम्हाला वारंवार सर्दी-पडसे किंवा घशात त्रास होत असेल तर हे पिऊ नका. यामुळे त्रास वाढू शकतो. 


5. जिरे 
या ऋुतूत होणाऱ्या पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी जिरे फायदेशीर आहे. यात असणारे अँटीऑक्सिडेंटस पचनक्रिया मजबूत करते. याशिवाय ताप कमी करण्यास मदत होऊ शकते. जर तुमचे केस गळत असतील तर जिरे खाल्ल्यामुळे केसगळती कमी होते. यामुळे त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासही मदत मिळते. 

बातम्या आणखी आहेत...