वास्तू / नकारात्मकता दूर करण्यासाठी घरामध्ये शिंपडले जाते गोमूत्र, लोबान आणि चंदन जाळून केला जातो धूर

घराची सकारात्मकता वाढवण्यासाठी रोज सकाळी अंगणात रांगोळी काढण्याची प्रथा

दिव्य मराठी

Jun 30,2019 12:10:00 AM IST

ज्या घरामध्ये नकारात्मकता असते तेथे राहणाऱ्या लोकांच्या विचारांवर याचे वाईट प्रभाव पडतात. हे लोक नेहमी प्रत्येक गोष्टीकडे पहिले नकारात्मक दृष्टीने पाहतात. यामुळे कामामध्ये यश मिळत नाही आणि अपयशाला सामोरे जावे लागते. घरातील वस्तू दोषांमुळेही अशी स्थिती निर्माण होऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य आणि वास्तू विशेषज्ञ पं. मनीष शर्मा यांच्यानुसार वास्तुदोष दूर केल्याने घरामध्ये सकारात्मकता वाढते.


मिठाच्या पाण्याने पुसून घ्या घर
घरातील नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठी घर पुसून घेताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाका. यासाठी खडेमीठ वापरू शकता. या उपायाने घरातील नकारात्मक उर्जा नष्ट होईल.


रांगोळी काढावी -
दररोज घराच्या मुख्य दरवाजासमोर रांगोळी अवश्य काढावी. रांगोळीने घराचे वातावरण पवित्र आणि सकारात्मक बनते. रांगोळी देवी-देवतांच्या सन्मान आणि स्वागतासाठी काढली जाते. ज्या घराबाहेर दररोज सुंदर रांगोळी काढली जाते, त्या घरावर सर्व देवी-देवतांची कायम कृपा राहते.


गोमुत्र शिंपडावे
नियमितपणे घरामध्ये गोमुत्र शिंपडल्यास घरातील वास्तुदोष कमी होऊ शकतात. वास्तूदोषामुळे निर्माण होता असलेल्या अडचणी दूर होतात. घराच्या जवळपास नकारात्मक उर्जा सक्रिय असेल तर ती निष्क्रिय होते. घरातील वातावरणात उपस्थित असलेले विविध प्रकारचे हानिकारक सूक्ष्म किटाणू गोमुत्राच्या प्रभावाने नष्ट होतात. गोमुत्रामुळे कुटुंबातील सदस्यांना आरोग्यदायी लाभ प्राप्त होतात.


या पाच गोष्टींचा धूर काहीकाळ घरामध्ये करावा...
घरातील नकारात्मक उर्जा नष्ट करण्यासाठी घरामध्ये दररोज 5 पवित्र वस्तूंचा धूर करावा. या पाच वस्तू कापूर, शुद्ध तूप, चंदन, लोबान (उद), गुगुळ आहेत. गाईच्या शेणापासून तयार केलेली गौरी जाळून त्यावर या पाच वस्तू टाका. त्यानंतर यामधून नेघालेला धूर घरामध्ये थोडावेळ पसरू द्या. या पाचही वस्तू पवित्र मानण्यात आल्या असून यामधून निघणारा धूर घरातील वातावरण पवित्र करतो. सूक्ष्म किटाणू नष्ट होतात आणि वास्तुदोष समाप्त होतो. सकारात्मक उर्जा वाढते. या पाचही वस्तू बाजारात सहजपणे मिळतात.

X