Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Tips To Avoid Overeating And Eat Less In Diwali

दिवाळीला ओव्हरईटिंगपासून बचाव करण्यात मदत करतील या 10 Tips, अवश्य वाचा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 12:00 AM IST

या ट्रिक्स वापरल्याने तुमचे वजन वाढणार नाही

 • Tips To Avoid Overeating And Eat Less In Diwali

  दिवाळीला घराघरात फराळ बनवला जातो. यावेळी आपल्या घरी आणि नातेवाईक मित्र परिवाराच्या घरी आपण फराळाला जातो. यावेळी ओव्हर ईटिंग होण्याची शक्यता असते. फूड अँड न्यूट्रिशन एक्सपर्ट शैलजा त्रिवेदी सांगतात की, सणांच्या काळात आठवडाभर मिठाई, विविध पदार्थ आणि हेवी फूड आपण खात असतो. आपल्याला फिटनेसकडे लक्ष द्यायचे असते परंतू तरीही ओव्हरईटिंग होतेच. अशावेळी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. यामुळे तुम्ही ओव्हरईटिंग टाळू शकता.

  लहान प्लेटचा वापर
  प्लेट लहान घेतली तर ती कमी पदार्थांमध्येच भरलेली दिसते. यामुळे मेंदूला जास्त खाण्याचे सिग्नल मिळते आणि आपण कमी खातो.

  पारंपारिक नाष्टा करा
  स्नॅक्स किंवा मिठाईऐवजी पोहे, ब्रेड, कॉर्न फ्लॅक्स किंवा ओट्सचा नाष्टा करा.

  हळुहळू चावून खा
  चांगल्या प्रकारे चावून खाल्ल्याने पोट भरलेले असल्याची जाणिव होते. जास्त खाता येत नाही.

  प्लेटमध्ये घेऊन खा

  प्लेटमध्ये काढून खाल्ल्याने तुम्ही किती खात आहात याचा अंदाज तुम्हाला येतो. कॅलरी काउंट करता येते.

  जास्त तिखट पदार्थ खा
  यामुळे तुम्ही जास्त पाणी पिता आणि कमी खाता. मिरचीमुळे मेटाबॉलिज्म जलद होते.


  खाण्यापुर्वी पाणी प्या
  जेवणाच्या थोडा वेळपुर्वी एक ग्लास पाणी प्या. यामुळे तुम्ही कमी खाता.


  फायबर रिच फूड्स
  ओटमील, फायबरचे फ्रूट, व्हेजिटेबल्स खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते.

  च्युइंगम चावा
  आपण काही चावत असलो तर खाण्याची इच्छा कमी होते. च्युइंगम चावल्याने फायदा होईल.

Trending