Home | Health And Lifestyle | Yoga Day | tips to take care of your wrist watch

10 TIPS: तुम्ही हातात घड्याळ घालता ना, वॉच दिर्घकाळ टिकावी म्हणून अशी घ्या काळजी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 16, 2018, 03:39 PM IST

वर्षानुवर्षे टिकून राहते घड्याळ

 • tips to take care of your wrist watch

  रिस्ट वॉच म्हणजेच मनगटावरील घड्याळ आपल्या लाइफमध्ये खुप गरजेचे असते. कारण याशिवाय आपण घरातून बाहेर पडत नाही. टाइटन शोरुम स्टोरचे मॅनेजर महेश गोवानी सांगतात की, घड्याळाची काळजी घेणे आपली जबाबदारी असते. यामुळे ते जास्त दिवस टिकू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही युजफूल टिप्स सांगत आहोत...

  - वॉच कधी व्हायब्रेटिंग इलेक्ट्रिक अप्लायंस म्हणजेच रेफ्रिजरेटर, टीव्ही किंवा कूलरवर ठेवू नका, कारण यामुळे इंटरनल पार्ट्स डिस्टर्ब होऊ शकतात.
  - रिस्ट वॉचचा ग्लास विंडो क्लीनने क्लीन करु शकता. परंतु हे साफ करण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करा.
  - तुमच्या रिस्ट वॉचचा बँड जर लेदरचा असेल तर हे लेदर क्लीनरने आणि मेटलचा असेल तर ज्वेलरी क्लीनरने क्लीन करा.
  - रिस्ट वॉच कधीच स्वतः ओपन करण्याचा प्रयत्न करु नका. याने त्याच्या इंटरनल पार्ट्समध्ये धुळ जाण्याची भिती असते. यासाठी प्रोफेशनलची मदत घ्या.
  - आपली रिस्ट वॉच कधीच मॅग्नेट जवळ ठेवू नका. यामुळे नुकसान पोहोचू शकते.
  - रिस्ट वॉच सन एक्सपोजरपासून दूर ठेवा. यामुळे वॉचचा कलर फेड होतो आणि बॅटरीची लाइफ कमी होते. याचे लूब्रिकेंट्स ड्राय होऊ शकतात.
  - रिस्ट वॉच काढून कोठेही ठेवू नका. हे ठेवण्यासाठी याच्या बॉक्सचा वापर करा. स्क्रॅचेस येणार नाही.
  - रिस्ट वॉच यूज केल्यानंतर वॉच रोज मुलायम कपड्याने स्वच्छ करा. म्हणजे डस्ट, घाम किंवा मॉइश्चर क्लीन होईल आणि वॉचची लाइफ वाढेल.
  - रिस्ट वॉच घातल्यानंतर परफ्यूम अप्लाय करु नका. यामध्ये केमिकल्स असतात. जे बँडला नुकसान पोहोचवतात. लेदर बँडला जास्त नुकसान पोहोचते. हे क्लोरीनयुक्त पाण्यापासून दूर ठेवा.
  - प्रत्येक दोन-तीन वर्षांमध्ये ऑथराइज्ड सर्विस सेंटरमधून रिस्ट वॉच चेक करत राहा. यामुळे हे खराब होण्याअगोदर दुरुस्त करता येईल.

Trending