आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिपू सुलतानच्या चांदीच्या बंदुकीचा ५४, तर सोन्याच्या तलवारीचा १६ लाखांत लिलाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्कशायर - ब्रिटनच्या बर्कशायर शहरात बुधवारी भारतातील म्हैसूर संस्थानचा राजा टिपू सुलतानच्या काळातील विविध शस्त्रांचा लिलाव झाला. या लिलावाम‌ध्ये टिपू सुलतानच्या चांदीच्या बंदुकीला ६० हजार पाैंडांची (सुमारे ५४ लाख रुपये), तर सोन्याच्या तलवारीला १८,५०० पाैंडांची (सुमारे १६ लाख रुपये) किंमत मिळाली. तलवारीसाठी सर्वात जास्त म्हणजे ५८ बाेली लागल्या हाेत्या, हे विशेष! स्थानिक वृत्तपत्रांनुसार या बंदुकीची स्थिती दयनीय झाली आहे. त्यामुळे लिलाव करणाऱ्या संस्थेने ‘ही बंदूक थेट युद्धभूमीवरूनच उचलल्याची शक्यता आहे’ असे लिहिलेला कागद बंदुकीवर चिकटवला आहे.

 


दरम्यान, या लिलावाची माहिती मिळताच भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने लिलाव करणारी संस्था अंॅंटनी क्राइब लिमिटेडशी संपर्क साधून टिपू सुलतानच्या सर्व वस्तू भारतात परत पाठवण्याचा विचार करण्यास व सर्व वस्तू सुरक्षित ठेवण्यास सांगितले आहे.