आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायर चोरणारे जळगावचे दोघे वरणगावात अटकेत; भंडाऱ्यातून चोरले होते १८ लाखांचे टायर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरणगाव- भंडारा येथील टायरच्या गोदामातून १८ लाखांच्या टायर्सची रविवारी रात्री चोरी झाली होती. चार दिवसांनंतर महामार्गावर वरणगाव येथे संशयित ट्रक पोलिसांनी पकडला. जळगावच्या दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. शुभम अशोक तायडे (वय २१, जवाहरनगर, भंडारा, मूळ रा. आहुजानगर, जळगाव) व ट्रकचालक संभाजी पंडित पाटील (वय ५१ आहुजानगर, जळगाव) अशी दोघांची नावे असून दोघांना ट्रकसह ताब्यात घेण्यात आले आहे. 


भंडारा येथील वाहनाच्या टायरच्या गोदामातून शुभम तायडे याने मालक शहरात नसल्याची संधी साधून जळगावातील आहुजानगरातील रहिवासी असलेला ट्रकचालक संभाजी पाटील याला बोलावून बनावट चावीद्वारे गोदामातील सुमारे १५ ते १८ लाख रुपये किंमतीचे ५०० नग टायर्स रविवारी रात्री लांबवले होते. सोमवारी गोदाम मालक अरुण गुप्ता यांना ही बाब कळताच त्यांनी भंडारा पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली होती. तर त्यानंतर राज्यभर अलर्ट जारी करण्यात आला होता. आरोपी ट्रक (एम.एच.१८ बी.जे.३२०६ व एम.एच.१८ बी.जे.०५०७) ने पसार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार नाकाबंदीदेखील करण्यात आली. त्यानुसार महामार्ग क्रमांक सहावर वरणगाव गावाजवळ नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना टायरने भरलेला ट्रक संशयितरित्या दिसून आला. याबाबत चौकशी केली असता समाधानकारक उत्तरे पोलिसांना मिळाली नाही. त्यामुळे हे टायर चोरीचे असल्याची खात्री पोलिसांना झाली. बुधवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर पोलिस उपविभागीय अधिकारी सुभाष नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी लावण्यात आली. नूतन सहायक पोलिस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक नीलेश वाघ, उपनिरीक्षक पठाण, नागेंद्र तायडे, मेहरबान तडवी, एएसआय कुलकर्णी आदींनी ही कारवाई केली. सायंकाळी भंडारा पोलिसांना आरोपींचा ताबा देण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...