आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबेळगाव- झोप आल्यावर कोण कुठे झोपेल याचा काही नेम नसतो. रेल्वेमध्ये आपल्याला अनेकजण डुलक्या मारायलेले आढळतात, तर अनेकजण स्टेशनवर झोपलेले दिसतात. पण बेळगावमधील एका वृद्ध व्यक्तीने कमालच केली. थकल्यामुळे त्यांना झोप आली पण ती चक्क रेल्वे रुळावरच.
थकलेल्या आजोबांना रेल्वेच्या रुळावर झोप लागली. ते इतके गाढ झोपले की, त्या ट्रॅकवर रेल्वे आली, त्यांच्या अंगावरु गेली तरीदेखील त्यांना पत्ता लागला नाही. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक रेल्वे स्टेशनजवळ हा प्रकार घडला. अंगावरुन रेल्वे जात असताना रेल्वेच्या आवाजाने आजोबांना जाग आली, तोपर्यंत अर्धी रेल्वे पुढे गेली होती. मग आसपासच्या लोकांनी आरडा-ओरडा करुन त्यांना तसेच गुपचूप पडून राहायला सांगितले. त्यानंतर काही वेळाने रेल्वे थांबली आणि आजोबा हळूच ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूने बाहेर पडले.
या आजोबांच्या अंगावरुन मालगाडी गेली, त्यामुळे त्यांना साधे खरचटलेही नाही. दरम्यान आजोबांना रुळावरच कसकाय झोप लागली, त्यांना गाडी आल्यावरही जाग कसकाय आली नाही असे प्रश्न बघ्यांना पडले. पण सुदैवाने त्यांचा जीव वाचला आणि ते सुखरुप बाहेर पडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.