आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोपाळ- देशातील सर्वात श्रीमंत मंदीरांपैकी एक असलेल्या तिरुपती बालाजी मंदीर आता आंध्र प्रदेशमधून बाहेर येणाच्या तयारीत आहे. तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट एक नवीन योजना आणत आहे. त्यानुसार आता देशभरातील मागास आणि आदिवासी भागात तिरुपती बालाजीचे मंदीर उभारले जाणार आहे. या योजनेअंतर्गत देशातील पहिले मंदीर आंध्र प्रदेशमधील अमरावतीमध्ये उभारण्यात येणार आहे. हे तिरुपतीपासून अंदाजे 400 किलोमीटर दूर आहे. या मंदीराला तिरुपती बालाजी मंदीराप्रमाणेच भव्य रुप देण्यात येईल. या मंदीराचे भूमिपूजन झाले आणि लवकरच काम सुरू होईल.
तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे पीआरओ टी रवी यांनी सांगितल्यानुसार, पहिल्या टप्प्यात यासाठी फंड जमवणे सुरू झाले आहे. सध्या या योजनेच्या प्रचार आणि प्रसाराचे काम सुरू आहे. श्रीवाणी ट्रस्ट (श्री वेंकटेश्वरा आलेयला निर्माणम ट्रस्ट)च्या माध्यमातून नागरिकांकडून दान जमा केले जाईल. यासाठी प्रती व्यक्ती 10 हजार रुपये दान ठरवण्यात आले आहे. भक्त यापेक्षा जास्तीचे दानही देऊ शकतात. आतापर्यंत 3.2 कोटी रुपये जमा झाले आहेत. या ट्रस्टमध्ये दान केलेल्या व्यक्तींना तिरुपती बालाजीचे व्हीआयपी दर्शन करवले जाईल. आदिवासी आणि मागास भागांना मुख्य धारेत आणण्यासाठी त्या ठिकाणी मंदीर बांधण्याची योजना करण्यात आली आहे. मंदीर बांधल्यानि तिथे रोजगार आणि विकास होईल.
रवीने पुढे सांगितले की, ज्याप्रमाणे फंड गोळा होईल, त्यावरुन कोणत्या राज्यात आणि किती मंदीर उभारायचे हे ठरवले जाईल. श्रीवाणी ट्रस्टमध्ये लोक जोडले जात आहेत. ही योजना आताच सुरू झाली आहे, त्यामुळे याला गती मिळण्यासाठी थोडा वेळ लागेल. यावर तिरुमाला तिरुपती देवस्थान ट्रस्ट अनेक दिवसांपासून काम करत आहे.
अमरावतीमध्ये 25 एकरावर उभारण्यात येत आहे मंदीर
अमरावतीमध्ये मागच्या वर्षी तिरुपती मंदिरप्रमाणेच भव्य मंदीर उभारण्याचे काम सुरू झाले आहे. 25 एकर जमिनीवर उभारण्यात येत असलेल्या या मंदीरासाठी अंदाजे 150 कोटी रुपये खर्च होणार आहेत. यासाठी तिरुपती देवस्थान ट्रस्ट आणि आंध्र सरकार मिळून काम करत आहे. हे मंदीर हुबेहुब तिरुपती बालाजी मंदीराची नक्कल असेल. यात चालुक्य आणि चोल काळातील वास्तु असेल, जे आगम शास्त्रावर आधारित आहे.
तिरुपती ट्रस्ट
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.