आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओडिशा-आंध्रला उद्या धडकेल 'तितली' वादळ; ओडिशासाठी रेड अलर्ट जारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर/विशाखापट्टणम- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दबावाच्या क्षेत्राचे मंगळवारी 'तितली' या चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. ते गुरुवारी ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या विशेष बुलेटिननुसार ओडिशासाठी बुधवार व गुरुवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


वादळामुळे दोन्ही राज्यांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच ताशी १०० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. बुधवार व गुरुवारी समुद्रातील हालचाली पाहता या किनारपट्टी भागातील मच्छिमारांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अर्ध्या मीटरपेक्षा कमी उंचीच्या लाटा उसळण्याच्या शक्यतेमुळे सखल भागात पाणी तंुबू शकते. 


५३० किमी अंतरावर वादळ 
चक्रीवादळ इशारा केंद्राच्या (सीडब्ल्यूसी) एका प्रवक्त्याने सांगितले की, तितली वादळ मंगळवारी सायंकाळी ओडिशाच्या गोपालपूरपासून ५३० किमी आणि आंध्र प्रदेशच्या कलंगपट्टणमपासून ४८० किलोमीटर अंतरावर होते. बुधवारी वादळाला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...