आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिवरे धरण दुर्घटना : १८ मृतदेह सापडले, सहा जण अद्याप बेपत्ताच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी - चिपळूणजवळील तिवरे धरणाचा बांध फुटून झालेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या २४ जणांपैकी १८ जणांचे मृतदेह शाेधण्यात गुरुवारी सायंकाळपर्यंत एनडीआरएफच्या पथकाला यश आले हाेते. उर्वरित सहा जणांचा मात्र घटनेच्या तिसऱ्या दिवशीही शाेध लागला नाही. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा ही शाेधमाेहीम सुरूच राहणार असल्याचे एनडीआरएफचे सच्चितानंद गावडे यांनी सांगितले. मृतांत १२ पुरुष व सहा महिलांचा समावेश आहे.

 

तडे गेलेले हे धरण मंगळवारी पावसामुळे तुडुंब भरले. मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास ते फुटले व पायथ्याशी असलेल्या गावातील १२ घरे वाहून गेली. बुधवारी एनडीआरएफच्या शाेधमाेहिमेत दिवसभरात १३ मृतदेह शाेधण्यात यश आले हाेते, उर्वरित ५ मृतदेह गुरुवारी सापडले. धरणापासून ३५ किलाेमीटरवर वशिष्ट नदीपात्रात महिलेचा मृतदेह सापडला, तर इतर मृतदेह पाण्यावर तरंगताना तर काही झाडाझुडपात अडकलेल्या अवस्थेत आढळून आले. 

बातम्या आणखी आहेत...