Home | Maharashtra | Kokan | Thane | tmt-tmc-politics-thane

'टीएमटी'च्या समितीचा परिवहन समितीकडून निषेध

divya marathi team | Update - May 24, 2011, 05:55 PM IST

ठाणे - ठाणे महापालिका (टीएमसी) व ठाणे महापालिका परिवहन सेवा (टीएमटी) यांच्यातील वाद पुन्हा उफाळला आहे.

  • tmt-tmc-politics-thane

    ठाणे - ठाणे महापालिका (टीएमसी) व ठाणे महापालिका परिवहन सेवा (टीएमटी) यांच्यातील वाद पुन्हा उफाळला आहे. "टीएमटी'चा कारभार सुधारण्यासाठी स्थापन केलेल्या महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून मनमानी कारभाराचा निषेध करीत परिवहन समितीची सभा तहकूब करण्यात आली. विशेष म्हणजे सत्ताधारी शिवसेना-भाजपसह सर्व पक्षांचे सदस्य तहकुबीत सहभागी झाले होते.
    सभेच्या अध्यक्षस्थानी जितेंद्रकुमार इंदिसे होते. मागील सभेचे इतिवृत्त वाचन सुरू असताना टीएमटीच्या सल्लागाराच्या मुदतवाढीचा विषय आला. त्या वेळी कॉंग्रेसचे सदस्य भरत ठक्कर यांनी मुदतवाढीचा विषय तहकूब केला असताना इतिवृत्तात मंजूर कसा झाला, असा मुद्दा उपस्थित केला.Trending