आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण अध्यादेशाविरुद्ध विद्यार्थ्यांचे मुंबईत आंदाेलन, न्यायालयात दाद मागणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात एसईबीसीअंतर्गत मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला विरोध करत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी पालकांसह शनिवारी कार्टर रोड येथे आंदोलन केले. यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्यपालांना पत्र पाठवून अध्यादेशावर स्वाक्षरी करू नये, अशी विनंती केली. 


न्यायालयात या अध्यादेशाच्या विरोधात याचिका दाखल करून अध्यादेश लागू करू नये, अशी मागणीही करण्यात येणार आहे. राज्य सरकारने ही बाब लक्षात घेऊन अगोदरच कॅव्हेट दाखल केले आहे. मराठा विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात १६ टक्के आरक्षण दिल्यानंतर खुल्या प्रवर्गातील जागा कमी होणार असल्याने या विद्यार्थ्यांनी आंदोलनाची तयारी सुरू केली होती. परंतु त्यांना आझाद मैदान येथे आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. शनिवारी त्यांना वांद्रे कार्टर रोड येथे तीन तास आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...