आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे सर्वांना लष्करी सेवा Compulsory; तरीही युवकांनी काढली अशी पळवाट, प्रशासनही झाले हैराण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल - जगातील सर्वात कडेकोट सीमारेषा असलेल्या दक्षिण कोरियात सर्वच नागरिकांना लष्करी सेवा देणे बंधनकारक आहे. सर्वांना लष्करात ठराविक काळापर्यंत सैन्यात सामिल व्हावे लागते. परंतु, राजधानी सियोलच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या 12 विद्यार्थ्यांनी बंधनकारक लष्करी सेवा टाळण्यासाठी अशी पळवाट काढली की ते पाहून प्रशासनही हैराण झाले आहे. लष्करी सेवेत सामिल होण्यासाठी सर्वांना फिजिकल टेस्टमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन युवकांनी जंक फूड खाऊन आपले वजन अवघ्या 6 महिन्यांत इतके वाढवले की ते शारीरिक चाचणी पास होऊ शकणार नाहीत.


> या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा सोशल मीडिया आणि ऑनलाइन चॅटिंगमधून झाला आहे. राजधानीत अनोखी पळवाट काढणाऱ्या या विद्यार्थ्यांनी इतरांनाही लष्करी सेवा कशी टाळता येईल याचे सल्ले देण्यास सुरुवात केली होती. परंतु, त्यांच्या चर्चा लीक होऊन लष्करी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे, दक्षिण कोरियात 28 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सर्वच पुरुषांना 2 वर्षांसाठी लष्करी सेवा द्यावीच लागते. या सेवेत सहभागी होण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या फिजिकल टेस्टच्या 6 महिन्यांपूर्वी युवकांनी जंक फूड खाऊन आपले वजन 20 ते 30 किलोंनी वाढवले होते. 
> हे सर्वच 12 विद्यार्थी म्यूझित विषयातून पदवी घेतलेले आहेत. कठोर आर्मी ट्रेनिंग दरम्यान त्यांना गाता देखील येणार नव्हते. त्यामुळेच, त्यांनी ही अनोखी शक्कल लढवली होती. यानंतर सर्वांना सामुदायिक सेवा देण्याची शिक्षा झाली आहे. एवढेच नव्हे, तर लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात खटला दाखल करण्याची तयारी सुद्धा सुरू केली आहे. दोषी सापडल्यास त्यांना वजन कमी करून लष्करी सेवेत सहभागी व्हावे लागेल. यानंतर पुन्हा सामुदायिक सेवेची शिक्षा भोगावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...