आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीजिंग । चीनने मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या संयुक्त राष्ट्राच्या माेहिमेवर व्हेटोचा वापर केला होता. त्यानंतर भारतात सोशल मीडियावर चिनी उत्पादनावर बहिष्कार मोहीम चालवण्यात आली. अनेक नेते आणि व्यापाऱ्यांनी बहिष्काराच्या बाजूने मत व्यक्त केले. यावर आता चीनची प्रतिक्रिया आली आहे. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित एका लेखात म्हटले आहे की, भारताला आवडो अथवा न आवडो, चिनी वस्तूंची खरेदी करणे त्यांची मजबुरी आहे. भारताकडे दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही. लेखामध्ये भारतीय नेत्यांनी ट्विटरवर चीनच्या विरोधात गांेधळ करण्यापेक्षा स्वत:च्या देशाची क्षमता वाढवण्यावर लक्ष द्यायला हवे, असा टोलाही लावला आहे. भारतातील निर्मिती उद्योग अद्याप विकसित झालेला नाही. भारत वस्तूंच्या उत्पादनामध्ये सक्षम नाही. त्यामुळे चिनी उत्पादने खरेदी खरेदी केल्याशिवाय भारताकडे पर्याय नाही. ते भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन करू शकत नाही.
चीनमध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित या वृत्तपत्रांमध्ये ज्या भारतीय नेत्यांवर टीका करण्यात आली त्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचाही समावेश आहे. वृत्तपत्राने लिहिले आहे की, भारतात रिफॉर्मच्या प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण करणाऱ्या शक्ती काम करत आहेत. या नेत्यांनी मत मिळवण्यासाठी चीनच्या विरोधात वातावरण निर्माण करायला नको. भारतीय लोकांचे लक्ष मुख्य मुद्द्यांवरून दुसरीकडे वळवण्यासाठी चीनकडे वळवून उपयोग होणार नाही. यामुळे भारतातील अंतर्गत अडचणी आणखी वाढतील. भारत आणि चीन यांच्या दरम्यान संबंधात काही वर्षांत सुधारणा झाली आहे आणि भारताच्या व्यापारी तुटीला कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करत अाहोत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादाला हवा देऊन लोकप्रियता मिळवण्यासाठी भारतीय लोकांमध्ये चीनला धोका असल्याचे दाखवणे धोकादायक असेल. यामुळे नेत्यांना फायदा होईल, मात्र भारतीय अर्थव्यवस्थेला नुकसान होईल.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.