आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • To Complete The Mobile Game Task 10 years Old Girl Traveled 10 Cities In 18 Days

मोबाइल गेमचा टास्क पूर्ण करण्यासाठी घरातून पळाली 10 व्या वर्गातील मुलगी, 18 दिवसांत फिरली 10 शहरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : उत्तराखंडच्या पंतनगर भागातील एक 10 व्या वर्गातील मुलगी 'टॅक्सी ड्रायव्हर - 2' या मोबाइल गेमच्या सवयीमुळे घरातून पळाली. घरून पळाल्यानंतर 18 दिवस ती 10 शहर फिरली. जेव्हा ती दिल्लीमध्ये फिरत होती तेव्हा पोलिसांनी तिला पकडले. ती घरात ना सांगता पळाली होती. दिल्ली पोलिसांनी पंत नगर पोलिसांना सूचित केले. त्यानंतर तिच्या घरचे तिला घेऊन गेले. गुरुवारी दिल्ली पोलिसांनी तिला कमला मार्केटमध्ये फिरताना पहिले आणि तिची विचारपूस केली असता खुलासा झाला की, ती गेममुळे घरातून पळाली होती.  

 

एसएसपी बरिंदरजीत सिंहने सांगितले, 'मुलगी 1 जुलैपासून गायब होती. दिल्ली पोलिसांनी तिला कमला मार्केटमध्ये पकडले.' पोलिसांनी सांगितले की, मुलगी आपल्या आईच्या मोबाइल फोनवर 'टॅक्सी ड्रायव्हर -2' (साउथ कोरियन गेम) गेम खेळत होती. ज्यानंतर ती गायब झाली. सिंहने सांगितले, 'दिल्ली पोलिसांनी माच्यांशी संपर्क साधला आणि सांगितले की, मुलगी 1 जुलैला पंत नगरमधून पळाली होती. जी दिल्लीमध्ये आहे. ज्यानंतर आम्ही दिल्लीला पोहोचलो आणि मुलीला कुटुंबियांच्या स्वाधीन केले.'

 

सब-इंस्पेक्टर विपुल जोशीने मुलीची विचारपूस केली, तेव्हा तिने सांगितले की, तिला उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आईच्या मोबाइल फोनवर गेम डाउनलोड केला होता. तिला त्या गेमची सवय झाली होती. तेव्हा तिने निर्णय घेतला की, गेमचे कॅरेक्टर (एक टॅक्सी ड्रायव्हर, गेममध्ये अनेक शहर फिरतो.) प्रमाने तीही फिरेल. जोशीने सांगितले, 'या गेममध्ये एक टॅक्सी ड्रायव्हर पॅसेंजर ला बसवतो आणि अनेक प्रॉब्लेम पार केल्यानंतर त्यांना ड्रॉप करतो. मुलीला हे कॅरेक्टर रिअलमध्ये साकारायचे होते. तिला शहर शहर फिरायचे होते. त्यामुळे ती घरातून पळाली होती.' या प्लॅननुसार, मुलीने घरातून 12 हजार रुपये चोरले आणि घरून पळून यूपीच्या बरेली शहरात बसने आली. तिथे पोहोचल्यावर ती लखनऊच्या बसमध्ये बसली आणि तिथून जयपुरसाठी तिने बस पकडली. त्यानंतर ती उदयपुर, जोधपुर, अहमदाबाद आणि पुणे फिरली. 

 

ती दिल्लीला येण्यासाठी पुण्याहून जयपुरला पोहोचली. या प्रवासात ती तीनदा दिल्लीला आली होती. दिल्लीहुन ती ऋषिकेशला गेली होती त्यानंतर पुन्हा दिल्लीला आली होती. त्यानंतर ती ऋषिकेश आणि हरिद्वारला गेली आणि दिल्लीला आली. यानंतर पोलिसांनी तिला पकडले. सब-इंस्पेक्टर विपुल जोशीने सांगितले, 'पोलिसांनी तिचे लोकेशन जयपुरमध्ये ट्रॅक केले होते. तेथून तिने बस तिकिटासाठी भावाचा ईमेल आयडी दिला. जेव्हा आम्ही जयपुरला पोहोचलो तेव्हा ती तिथून गेली होती.' मुलीने पोलिसांना सांगितले की, हॉटेलमध्ये थांबण्यासाठी तिला आयडी कार्डची गरज होती. त्यापासून वाचण्यासाठी ती रात्री स्लीपर बसमध्ये प्रवास करायची. ती मागचे 18 दिवस बिस्किट, चिप्स आणि पाणी पिऊन जगली. एवढेच काय तिने अंघोळी केली नव्हती. मुलीचे पिता एका लोकल शाळेत काम करतात, त्यांनी सांगितले, 'मुलगी आईचा मोबाइल वापरायची. आम्हाला माहित नव्हते ती काय करायची. आम्ही नशीबवान आहोत की, मुलगी परत आली आहे.'