Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | to-get-rid-of-hesitation

भिडस्तपणा दूर करण्यासाठी सात उपाय

दिव्य मराठी टीम | Update - May 19, 2011, 03:22 PM IST

भिडस्त स्वभावामुळे किंवा भित्रेपणामुळे एखादी व्यक्ती आपल्यातील सर्व गुण इतरांसमोर मांडू शकत नाही.

 • to-get-rid-of-hesitation

  भिडस्त स्वभावामुळे किंवा भित्रेपणामुळे एखादी व्यक्ती आपल्यातील सर्व गुण इतरांसमोर मांडू शकत नाही. एखादी प्रतिभावान व्यक्तीही भिडस्तपणामुळे आपल्या गुणांना इतरांसमोर व्यक्त करू शकत नाही. व्यासपीठावर जाण्याची भीती वाटणे, संकोचणे, चार व्यक्तींमध्ये बोलताना थरथरणे, यामुळे काही व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागतो.

  काही उपायांमुळे व्यक्ती आपल्या भिडस्त किंवा भित्रेपणावर मात करू शकते आणि आत्मविश्वासाने आपले जीवन जगू शकते.
  १. नकारात्मक विचारांपासून आणि तसा विचार करणाऱया मित्रांपासून दूर राहा.

  २. आपला दिनक्रम नियमित ठेवा.

  ३. नियमित दिनक्रमात योग आणि प्राणायामाला स्थान द्या.

  ४. रोजच्या रोज किमान ३० मिनिटे अध्यात्मिक साहित्याचे वाचन करा.

  ५. लवकर झोपण्याची आणि पहाटे लवकर उठण्याची सवय करून घ्या.

  ६. स्वप्नरंजनात न पडता एखादे छोटेच काम हातात घ्या आणि ते पूर्णपणाने यशस्वी कसे होईल, याकडे लक्ष द्या.

  ७. खूपच भिडस्तपणा किंवा भित्रटपणा जाणवत असेल, तर एखाद्या मनोविकारतज्ज्ञांला भेटा आणि मनमोकळेपणाने त्याला आपल्या सर्व समस्या सांगा.

  वर दिलेल्या उपायांचा पूर्णपणाने अवलंब केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढू लागेल. जसा प्रकाश पसरू लागला की अंधार दूर होतो. त्याच पद्धतीने आत्मविश्वास वाढू लागल्यावर हळूहळू काल्पनिक भीतीपासून तुमची नक्कीच सुटका होईल.

Trending