श्लोक समस्या निवारणासाठी / श्लोक समस्या निवारणासाठी

दिव्य मराठी टीम

May 19,2011 01:26:27 PM IST

जगामध्ये कोणीही माणूस पूर्णपणे सुखी नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या जरूर असतेच. काही समस्या अल्पकालीन असतात तरी काही दीर्घकाळ आपल्याला सतावत राहतात. दुर्गासप्तशतीच्या ११ व्या अध्यायात वर्णन केलेला तिसरा श्लोक सगळ्या समस्यांच्या निवारणासाठी उपयुक्त आहे. या मंत्राचा रोजच्या रोज जप केला तर सगळ्या समस्यांचे निवारण होऊ शकते.

मंत्र
देवि प्रपन्नार्तिहरे प्रसीद
प्रसीद मातर्जगतोखिलस्य।
प्रसीद विश्वेश्वरी पाहि विश्वं
त्वमीश्वरी देवि चराचरस्य।।

जप विधी
- पहाटेच्यावेळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून माता दुर्गादेवीची पूजा करावी.

- त्यानंतर शांत ठिकाणी आसनावर बसून चंदनाच्या जपाच्या माळेच्या साह्याने या मंत्राचे पठण करावे.

- प्रत्येक दिवशी पाच माळांचा जप केल्यावर सगळ्या आपत्तींचा नाश होतो.

- जर प्रत्येक दिवशी जपाची वेळ, स्थान, आसनव्यवस्था आणि माळ एकच असेल तर हा मंत्र लवकरच सिद्धीस जातो.

X
COMMENT