Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | to-get-rid-of-tiredness

फूलटाईम रिचार्ज राहण्याचा उपाय

दिव्य मराठी टीम | Update - May 19, 2011, 03:30 PM IST

थकवा हा असा आजार आहे की जो अप्रत्यक्षपणे आपले परिणाम कोणत्याही व्यक्तीवर दाखवतो.

  • to-get-rid-of-tiredness

    थकवा हा असा आजार आहे की जो अप्रत्यक्षपणे आपले परिणाम कोणत्याही व्यक्तीवर दाखवतो. संशोधक आणि वैज्ञानिक आज मोठ्यातील मोठ्या आजारावर नियंत्रण कसे मिळवायचे, याच्या जवळ पोचले आहेत. मात्र थकव्यावर उपाय काय, हे आजपर्यंत कोणीच शोधून काढू शकलेले नाही.

    थकव्यावर मात करण्याचा एक नैसर्गिक उपाय इथे आम्ही तुम्हाला देत आहोत. या उपायाचा प्रभाव तुम्हाला काही मिनिटांतच जाणवेल.
    टेबलवर आपल्या हाताचा कोपरा ठेवून बसावे. त्यानंतर हाताला छातीसमोर आणून पंज्याच्या साह्याने गालावर हात फिरवा. ही क्रिया करताना आपले डोळे मिटून घ्यावेत. जर तुम्ही घरी असाल, तर झोपून सुद्धा ही क्रिया करू शकता. तसे करताना पाय गुडघ्यातून दुमडावेत. दोन हाताचे पंजे परस्परांवर घासावेत, जेणे करून ते गरम होतील. त्यानंतर ते डोळ्यांवर ठेवावेत. यावेळी मोठा श्वास घ्यावा. बंद डोळ्यांच्या साह्याने अंधाराचा अनुभव घ्यावा आणि डोळ्यांवर गरम हात ठेवल्याचा अनुभव घ्यावा. त्यानंतर डोकं खाली करावे. ही क्रिया करताना मनात कोणताही विचार आणू नका. पाच ते दहा मिनिटे ही कृती करावी.

    रात्री झोपण्यापूर्वी पाऊण बादली पाण्यात मीठ टाकून त्यामध्ये तुमचे पाय गुडघ्यापर्यंत बुडतील अशा पद्धतीने १५ मिनिटांसाठी ठेवावेत. असे केल्याने संपूर्ण दिवसभरासाठीचा थकवा आणि नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे गायब होईल.

Trending