आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • To Get The Kids Excited For School Prayer Were Taken Place Not Only In Raw, But By Make Children Standing In Different Shapes Daily

मुलांना शाळेत येण्यासाठी उत्साह राहावा म्हणून येथे रांगेत नव्हे, तर दररोज नवा आकार करत होते प्रार्थना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हनुमानगडच्या मालारामपुरा गावातील शाळा
  • राजस्थानच्या सरकारी शाळेतील अनोखा उपक्रम
  • फक्त 5 मिनिटांत मुले तयार करतात साखळी

​​​​हनुमानगड : राजस्थानातील हनुमानगडच्या सरकारी शाळेत दररोज अशा प्रकारचे दृश्य दिसून येते. येथे सकाळी प्रार्थना रांगेत उभे राहून नव्हे तर सूर्य, चक्र, पृथ्वी, भारताचा नकाशा, स्वस्तिक व फुलाच्या पाकळ्याच्या आकाराची मानवी साखळी तयार केली जाते. या उपक्रमामुळे मुलांना दररोज शाळेत येण्यासाठी उत्सुकता वाढते. तसेच ते अनुशासन शिकतात. या उपक्रमाची सुरुवात रमेश जोशी या शिक्षकाने केली. मालारामपुरा गावातील सरकारी शाळेत हा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. शाळेत सकाळी होणारी प्रार्थना दररोज प्रसन्न करणारी असते. शिक्षकांनी सांगताच मुले केवळ ५ मिनिटांत उभे राहून कोणत्याही आकृतीसाठी तयार असतात.

परिणामी : शाळेत मुलांची संख्या वाढली

मुख्याध्यापक संत कुमार यांनी सांगितले, या उपक्रमामुळे शाळेत मुलांची संख्या व उपस्थिती दोहोत वाढ झाली आहे. सध्या शाळेत ३८५ विद्यार्थी आहेत. जे विद्यार्थी शाळेत नेहमी उशिरा येत तेसुद्धा वेळेत येत आहेत. यामुळे गावकरी खुश आहेत. आजूबाजूच्या शाळेत अशा प्रकारचा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 

बातम्या आणखी आहेत...